अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला.
अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग.
अंजनीबाई मालपेकर बंदिश धृपद अंगाने म्हणत. खानेपुरी, मुखविलास, आलापी, बोल भरणे, खुलाबंद बोल, उचकसमेट, मींड, कणस्वर, लयीच्या अंगाने सुंदर सरगम करणे इ. त्यांचे गानविशेष म्हणता येतील.
हेमराज नावाच्या कर्नाटकातील विख्यात वाद्यनिर्मात्यानं संपूर्ण आयुष्यात बारा-तेराच तंबोरे केले. पैकी एक तंबोरा त्यांनी अब्दुल करीम खाँना भेट दिला आणि दुसरा अंजनीबाईंना.
अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले.
अंजनीबाई मालपेकर या संगीत नाटक अकादमी पाठ्यवृत्ती मिळालेल्या पहिल्या महिला कलाकार होत्या.
अंजनीबाई मालपेकर यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख:
Leave a Reply