आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या ‘कच्ची धूप’ या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले.
पुढे त्यांनी ‘होली’, ‘गूँज’, ‘कभी हां कभी ना’, ‘सलीम लंगडे पे मत रो’ सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा ‘पहला नशा’ हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या ‘बाजी’च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे ‘लगान’ हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता.
‘लगान’ ने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले. आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये ‘लगान’ तयार केला.
आशुतोष गोवारीकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/ashutosh-govarikar/
# Govarikar, Aashutosh
Leave a Reply