अश्विनी भावे

मराठी-हिन्दी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री

अश्विनी भावे – मराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनीचा जन्म ७ मे रोजी कोकणस्थ ब्राम्हण भावे कुटुंबामध्ये झाला.

अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर तिने ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले.

१९९१ साली ’हिना’ या चित्रपटातुन तिने हिन्दी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अश्विनी लहानपणा पासुन ’ऋषी कपुर’ ची फॅन होती आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची तिची खूप इच्छा होती. ती इच्छा ’हिना’ चित्रपटातुन पुर्ण झाली. आपल्या आवडत्या अभिनेत्याबरोबर तिने अजुन काही चित्रपट केले, जसे ’हनिमुन’ व ’मुहब्बत की आरझु’.

अक्षय कुमार सोबत तिने काही चित्रपट केले. जसे ’अशान्‍त’, ’सैनिक’, ’जखमी दिल’. तिचे सहकलाकार होते जॅकी श्रॉफ, विनोद खन्ना व मिथुन चक्रवर्ती. तीने मीरा का मोहन, परंपरा, कायदा कानुन, चौराह, इका राजा रानी, वापसी साजन की व युगपुरुष या चित्रपटामध्ये काम केले. पण तिचे दोनच चित्रपट हिट झाले, ’भैरवी’ (१९९६) श्रीधर बरोबर आणि ’बंधन’ (१९९८) जॅकी श्रॉफ बरोबर. २००७ साली तिने ’कदाचित’ ह्या मराठी चित्रपटामध्ये काम केले.

तिने महाराष्ट्रीय सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्दिकर यांच्या बरोबर लग्न केले. किशोर हे एका इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. अश्विनीला आता दोन मुले आहेत आणि ती ’सन फ्रानसिस्कोला(अमेरीका) रहाते. मराठी चित्रपटाची ओढ आणि आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतुने बरेच वर्षांच्या गॅप नंतर तिने मराठी चित्रपट सृष्टीत पुन्हा प्रवेश केला तो एक निर्माती म्हणुन. तिने निर्मीती केलेला पहिला मराठी चित्रपट ’एवढंसं आभाळ’ हा लहान मुलांचे भावविश्व उलगडुन दाखवणारा एक अप्रतिम चित्रपट होय.

अश्विनी भावे यांच्यावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

## Bhave, Ashwini

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*