अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन या नाटकात काम केले होते. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ रोजी झाला.
उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्या अभिनय आणि नृत्यक्षेत्राकडे वळल्या. अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्य ही शिकल्या होत्या. त्या पुण्यातील कलावर्धिनी नृत्यसंस्थेच्या कोथरूड शाखेच्या प्रमुख होत्या. देबू, महागुरू, बावरे प्रेम हे, तप्तपदी, डंक्यावर डंका, आरंभ, क्षण हा मोहाचा, कॉफी आणि बरंच काही अशा मराठी चित्रपटांसह ‘एक पल प्यार का’ या हिंदी सिनेमातूनही त्यांनी भूमिका केली होती.
दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.
अश्विनी एकबोटे यांनी झी २४ तासच्या अनन्य सन्मान या कार्यक्रमात खास अँकरिंग केले होते. अश्विनी एकबोटे यांचे २२ आक्टोबर २०१६ रोजी नाट्यत्रिविधा हा कार्यक्रम करत असताना भरत नाट्यमंदिराच्या रंगमंचावरच आकस्मिक निधन झाले.
Leave a Reply