बालकुमार साहित्यकार सुधाकर प्रभू

सुधाकर प्रभू मराठी भाषेतील बालकुमार साहित्यकार होते.

सुधाकर प्रभू यांचा जन्म गोव्यात पेडणे गावी झाला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते मुंबईला गेले. या काळातच वयाच्या अठराव्या वर्षी `आनंद` व भा.रा. भागवतांच्या `बालमित्र` या मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. बी.ए. व बी.एड्. पदव्या संपादल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

सुधाकर प्रभू यांनी दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली. त्यातील `राजू प्रधान` ही व्यक्तिरेखा भा.रा. भागवतांच्या `फास्टर फेणे`प्रमाणे लोकप्रिय ठरली.

पुस्तकांखेरीज `साप्ताहिक स्वराज्य`, `रविवार सकाळ`, `साप्ताहिक हिंदू`, `साधना` यासारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले.

बालसाहित्यातील कामगिरीबद्दल गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार त्यांना लाभले.

कोल्हापूर येथे 1991 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

30 जुलै  2007 रोजी पुणे येथे सुधाकर प्रभू यांचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*