बेला शेंडे’ म्हटलं की आपल्याला कुठली गाणी आठवतात? ‘नटरंग’ ची ‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली लावणीगीते आठवतात, ‘सर सुखाची श्रावणी’, ‘का कळेना कोणत्या क्षणी’ किंवा ‘ओल्या सांजवेळी’ सारखी हळुवार प्रेमगीते आठवतात.
त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली.
बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी ‘सा रे ग म’ ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या.
दहावीत असतांना ही ‘सा रे ग म’ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांयचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या. मोठ्यांच्या झी ‘सा रे ग म’ मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या.
त्या ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.
Leave a Reply