मराठीतील किंग ऑफ कॉमेडी पर्सन व मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ रोजी झाला.
भरत जाधव हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. भरत जाधवचा जन्म लालबाग – परळ परिसरात झाला. तिथेच भरत जाधवचं बालपण गेले. भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली “लोकधारा” मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली.
भरत जाधव यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत जवळपास ८५ चित्रपट, आठ दूरचित्रवाणी मालिका केल्या तरी नाटकांमुळे ते अधिक लक्षात राहिला आहेत. गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सीरियस ‘अधांतर’ नाटक असो किंवा ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘ढॅण्ट ढॅण’ आणि ‘सही रे सही’ ही कॉमेडी नाटके.
तब्बल १५ वर्षे हे नाटक सलगपणे सुरू आहे. ‘सही रे सही’ या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले.
‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती. भरत जाधव निर्मिती क्षेत्रात असून ‘भरत जाधव एन्टरटेन्मेंट’ या नावाने कार्यरत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बॉलीवूडइतकी श्रीमंत नसली तरी मराठीतला सुपस्टार भरत जाधवने सर्वप्रथम स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन विकत घेऊन आद्य नटाचा मान मिळवला आहे.
Leave a Reply