लाकडासारख्या कठीण वस्तूमध्ये इतकी जिवंत जादू असावी हा एक चमत्कारच! हा चमत्कार प्रत्यक्ष उतरवणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध कलावंत म्हणजे दामोदर गणेश पुजारे. पुजारे ह्यांचा जन्म ११ जुलै १९३४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वालावलचा. पुढे त्यांनी उच्च कलाशिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९६२ साली ते आर्ट मास्टर झाले.
खरं तरं पुजारे ह्यांची ओळख कष्ठचित्रे (वुड कट्स) प्रकारामुळे आहे. कष्ठचित्रे ही त्यांची खासियत आहे. त्यांनी कला क्षेत्रातील विविध विभागात समर्थपणे व यशस्वीपणे कार्य केले आहे. हे वेळोवेळी शासकीय निरिक्षकांनी दिलेल्या वार्षिक अहवालात सिद्ध झाले आहेच. कला महाविद्यालयातील कला शिक्षणाची दिशा सर्वसामान्य जनतेला ज्ञात व्हावी यासाठी पालघर सातपाटी या कोळीवाड्यात विशेष उपक्रम त्यांनी घेतला. ज्यात विविध प्रात्यक्षिकांसहीत होड्या सजावट आणि बौद्धिक उपक्रमांचाही सहभाग होता. कला संचालक एन.सी.ई.आर.टी (दिल्ली) व शिक्षण संचालक यांच्या विद्यमाने सर्व राज्यांच्या नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन आयोजित उपक्रमात त्यांचा सहभाग होता. तसेच आय.एन.एस. हमला या भारतीय नौदलाचे कार्यालय व परिसराचे कलात्मक स्वरुप त्यांनी उत्कृष्टरित्या केले. मुंबई महापालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्बोधन, प्रात्यक्षिकर, आर्टिस्ट कॅम्प सारख्या उपक्रमात त्यांचा समावेश होता. वुटकट ही प्रिंटमेकींगची स्वत:ची शैली त्यांनी देशात तसेच जकाती आणि लंडन सारख्या शहरात एकूण २७ प्रदर्शनात परीक्षकही होते. ठाण्यातील कलाभवनात ५० मान्यवर कलाकारांचे चित्रांचे शिल्पांचे प्रदर्शन त्यांनी भरवले.
त्यांना आत्तापर्यंत तीन सुवर्णपदकांसह २४ पुरस्कार मिळाले आहेत.
Leave a Reply