कुलकर्णी, दत्तात्रेय भिकाजी



जन्म – २५ जुलै, १९३४

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे मराठी लेखक व साहित्य समीक्षक आहेत.

पुणे येथे २०१० साली झालेल्या ८३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.

नागपूर विद्यापीठाने १९६८ मध्ये त्यांना पीएच. डी. प्रदान केली आहे. विदर्भ साहित्य संघाचा साहित्य वाचस्पती (डी. लिट.समकक्ष पदवी) हा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे.

त्यांचे प्रकाशित साहित्य:
दुसरी परंपरा; ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद; मराठी वाङ्मयाचा इतिहास (४ खंड); देवदास आणि कोसला; द्विदल; युगास्त्र; अपार्थिवाचे चांदणे; सुरेश भट नवे आकलन; समीक्षेची सरहद्द; कादंबरी: स्वरूप व समीक्षा; महाकाव्यः स्वरूप व समीक्षा; पोएट बोरकर; मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र; पुनस्थापन; अन्यनता मर्ढेकरांची; पहिल्यांदा रणांगण; समीक्षेची वल्कले; समीक्षेची क्षितिजे; जीएंची महाकथा; ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती; स्फटिकगृहीचे दीप; अंतरिक्ष फिरलो पण..

नागपूर विद्यापीठाने ना. के. बेहेरे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला आहे.

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार

न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्यून चा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
कादंबरी : स्वरूप व समीक्षेला म.सा.प. चा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार, २००७

डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*