माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तत्ज्ञ व परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर, १९४६ ला महाराष्ट्रातील मुरंबा या गावी झाला. अभियांत्रिकिचे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बडोदा येथील महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापिठातून १९७२ मध्ये त्यांनी मास्टर ऑफ इंंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली. दिल्ली येथील इंंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी पीएच.डी . प्राप्त केली.
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्वल त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान २००० मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तत्पूर्वी १९९९ व २००० ला “महाराष्ट्र भूषण“ हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानासह राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. भारत सरकारच्या केद्रीय मंत्रिमंडळात नियुक्त केलेल्या शासकिय सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या माहिती तंत्रज्ञान कृती गटाचे ते सदस्य होते. भारताला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्याचे महत्वपुर्ण कार्य या समितीवर सोपविण्यात आले होते. रॉयल सोयायटीने त्यांना २००३ मध्ये व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते.
भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान संगणक क्षेत्रातील संयुक्त कराराचा तपशील निश्चित करण्यात त्यांनी महत्वपुर्ण कामगिरी केली. भारत रशियाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्तरित्या हाती घेतलेल्या दीर्घमुदतीच्या कार्यक्रमाचे (आयएलटीची) सदस्य आहेत. इंडीया हेंगरियन इंडो फ्रेंच संयूक्त आयोगाचेहि ते सदस्य असून सध्या ईटीएच रिसर्च लॅब चे अध्यक्ष आहेत. डॉ. भटकर यांना देशविदेशातील अनेक मान्यवर संस्थानी फेलो हा बहुमान प्रदान केला आहे. त्यात आय.ई.ई.ई. कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिहनअरिंग (नवी दिल्ली), महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्स (पुणे), इन्स्टिटयूशन ऑफ इलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकम्यूनिकेशन इंजिनिअर्स (दिल्ली) या संस्थाना समावेश आहे. याशिवाय न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (न्यूयॉर्क) आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय संस्थाचे सदस्य अथवा पदांवर कार्य करण्याचा बहूमान त्यांना प्राप्त झाला असून अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पूरस्कार प्राप्त झाले आहे.
We need your contact no.