<!–
– डॉक्टर
गाव : चौल खेदंडा
पत्ता : रामरंग, बी-१, स्वयंसृष्टी सोसायटी, चंदनवाडी, ठाणे (प.) ४००६०१
कार्यक्षेत्र : वैद्यक व्यवसाय (न्यूरोसर्जन)
दूरध्वनी : २५३०३८२६ – भ्रमणध्वनी : ९८२०१९८५९०
ई-मेल : vd-joshi@yahoo.co.in
–>
वैद्यक व्यवसायात न्यूरोसर्जन म्हणून ठाण्याचं नाव उभं करणारे न्यूरोसर्जन डॉ. विनायक दत्तात्रय जोशी हे ठाण्याचं भूषणच! सध्या ते सुश्रुषा रुग्णालय दादर येथे न्यूरोसर्जन म्हणून सेवा देत आहेत. यात ठाण्यातील “सिव्हील” व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश आहे. बारावीत (१९८१ साली) गुणवत्ता यादीत झळकलेले डॉ. विनायक यांनी १९८२-१९८७ दरम्यान एम.बी.बी.एस. आणि १९८८ ते १९९० या दरम्यान एम.एस. ह्या पदव्या प्राप्त केल्या.
निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोनातून आपल्या व्यवसायाकडे न पाहता समाजभावनेचे, सामाजिक भान ठेवून त्यांनी अनामत रक्कम न घेता पूर्ण, योग्य व आवश्यक ते आचार करायचे असे ध्येय ठेवून २००४ साली डॉ. जोशी यांनी “डिव्हाईन” हॉस्पिटलची स्थापना केली. त्याच अनुषंगाने विविध शिबीरं, व्याख्यानं यांच्या माध्यमातून रुग्णसेवा व आरोग्य प्रबोधनाचा प्रयत्न डॉ. जोशी करत असतात.
पुरस्कार : त्यांना “ठाणे भूषण २००६” आणि मेहता फाऊंडेशन डोंबिवलीचा “जनमित्र” पुरस्कार २००८ या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
Leave a Reply