ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फत्त* माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.
हिराबाईंचा जन्म १९०५ सालचा. लहापणापासूनच संगीताची विशेष आवड. सुरुवातीला आपले वडील बंधू सुरेश माने यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. तर त्यानंतर अतिशय शिस्तीचे, कडक आणि संगीतातले मातब्बर अशा वहीदखाँसारख्या गुरुंकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. रियाझ आणि प्रचंड मेहनत यामुळे मुळातच चांगला असलेला आवाज दिवसेंदिवस सुरेल झाला. त्यांच्या सुरेल आवाजातील शास्त्रीय संगीताच्या बैठकीना प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी झाली म्हणजेच आपल्या गायकीनी त्यांनी त्यावेळी क्रांती घडवून आणली. बालगंधर्वांनी सुद्धा हिराबाईंच्या गाण्याला, त्यांच्या सात्विक सूराला गौरविले होते. हिराबाईंनी गायलेली, ‘राधेकृष्ण बोल’, ‘उपवनी गात कोकिळा’, ‘ब्रिजलाला गडे’ ही अविट गोडीची पदे सर्वतोमुखी झाली होती. एक महिला असून त्याकाळी संगीतासाख्या समाजानी डावललेल्या कलेला, समाजाचा विरोध पत्करून समाजात प्रतिष्ठित करण्याचे मोठे कार्य हिराबाईंनी केले म्हणूनच आज आपण संगीताचा मुत्त*पणे आनंद उपभोगू शकतो आहोत.
अशा या स्वरांची अनुपम देणगी मिळालेल्या हिराबाईंचे २० नोव्हेंबर १९८९ ला निधन झाले.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
गानहिरा हिराबाई बडोदेकर (22-Nov-2016)
गानहिरा हिराबाई बडोदेकर (20-May-2017)
गानहिरा हिराबाई बडोदेकर (20-Nov-2018)
Leave a Reply