बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)

Tilak, Bal Gangadhar (Lokmanya Tilak)

राजकारणी, वृत्तपत्रकार, वैदिक संशोधक, प्राच्यविद्यापंडित आणि भगवदगीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. “

केसरी” व “मराठा” ही वर्तमानपत्रे सुरु करणार्‍या टिळकांचे आग्रलेख गाजले आणि ब्रिटिश सरकारची झोप उडवणारे ठरले. मंडालेच्या तुरुंगात असताना “गीतरहस्य अर्थात कर्मयोगशास्त्र” या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. वेदकालनिर्णयावर “ओरायन” आणि आर्यांच्या इतिहासशोधाचा “आर्क्टिक होम ऑफ द वेदाज” हे ग्रंथही त्यांनी लिहिले. परखड, सडेतोड राजकीय अग्रलेखांची मराठीतील परंपरा लोकमान्यांशीच नाते सांगते.

विद्वत्ता, अभ्यास आणि परखड लेखणी यांची सांगड राजकारणाशी घालणारे “लोकमान्य” बाळ गंगाधर टिळक यांचे ०१ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1 Comment on बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)

Leave a Reply

Your email address will not be published.


*