(जन्म १९४२)
जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ. मुंबईच्या विज्ञान संस्थेमधून १९६५ मध्ये एम.एस्सी. आणि हार्वर्ड विद्यापीठाची १९६९ मध्ये पीएच.डी. पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय, पनामा, पूर्व आफ्रिका, अमेरिका इथल्या पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास. भारतांतील बायोस्फिअर रिझर्व्ह यांच्या कक्षा ठरवून त्यांचे नियम करण्यासाठी व निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हच्या घाटीत प्रत्यक्ष फिरून धोरण आखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सस्तन प्राण्यांची वागणूक पद्धती, आदिवासी जमातींच्या पर्यावरणाला अनुकूल जीवनपद्धती आणि वा. द. वर्तक यांचेबरोबर अभ्यासलेले देवरायांचे महत्त्व, हे त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. माधव गाडगीळ यांना भटनागर पुरस्कार, भारतातील वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व, भारत सरकारची पद्मश्री इत्यादी सन्मानप्राप्त झालेले आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. १९८३ साली लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष हते.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply