समाजवादी नेते, अर्थतज्ञ व समाजसेवक, संसद सदस्य,माजी रेल्वेमंत्री प्रा.मधू दंडवते यांचा जन्म २१ जानेवारी १९२४ रोजी झाला. मधू दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते.
हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.
प्रा.मधु दंडवते यांनी एम. एससी. केल्यानंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथील भौतिकशास्त्र, त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि मुख्य भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये काम केले.
मधु दंडवते यांचे चिरंजीव उदय दंडवते हे अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को येथे डिझाइन रिसर्च कन्सल्टिंग क्षेत्रात काम करतात. सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे ते समर्थक आहेत.
मधू दंडवते यांचे १२ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झाले.
Leave a Reply