मधु मंगेश कर्णिक हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक आहेत. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करूळ, कणकवली तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा येथे झाला.
ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Leave a Reply