मंदार परब हे सध्या ‘झी चोवीस तास’ या प्रादेशिक बातम्या देणार्या, व मराठी भाषिकांचे जग व त्यांच्या जीवनांत घडलेल्या विवीध घडामोडी उलगडुन दाखविणार्या लोकप्रिय वाहिनीचे संपादक आहेत. त्यांनी संपादकस्थान स्वीकारल्यापासुन या वाहिनीचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. या वाहिनीच्या अंतररुपात व बाह्यररूपांत जे अमुलाग्र बदल घडले आहेत, त्यालादेखील मंदार यांची आभ्यासु
व नव्या तंत्रज्ञानांना कवटाळण्याची वृत्ती जबाबदार आहे. मंदार यांचे पदवी शिक्षण जी. डी. रूपारेल या मुंबईच्या प्रतिष्ठीत कॉलेजमधून पुर्ण झाले व ते झी परिवाराशी कायमचे जोडले गेले. मंदार परब ह्यांनी पत्रकारितेमध्ये सर्व मराठीजनांना अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावली असून ते सध्या झी नेटवर्क या भारतातल्या सर्वात जुन्या, प्रतिष्ठीत व गावोगावी पोहोचलेल्या टेलिव्हीजन कंपनी एडीटर इन चिफ या सन्मानित पदी विराजमान झाले आहेत.
जानेवारी 1, 2010 पासून झी चोवीस तास या प्रादेशिक बातम्या पुरविणार्या वाहिनीने नव्या युगाचा हात धरून आपल्या पारंपारिक पध्दतींची कात टाकली. नवे गणवेश, कल्पक व आकर्षक ग्राफिक्स, अतिशय बोलका लोगो, नवीन चॅनल आय. डी., व स्टुडिओ बॅकड्रॉप, अशा तंत्रज्ञानिक सुधारणांनी ही वाहिनी आता इतर सगळ्या प्रादेशिक वाहिन्यांची ‘दादा’ वाहिनी बनण्यास पुर्णपणे सज्ज झालेली आहे. सामान्य माणूस आदर्श व्यक्तिमत्वांपासून जसे की लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यापासून कशी प्रेरणा घेतो हे दाखविणारी छोटीशी चित्रफीत या वाहिनीतर्फे 1 जानेवारीपासून प्रसारित करण्यात आली. बातमी क्षेत्रात अनेक नवे नवे प्रयोग, उपक्रम, कार्यक्रम, व तंत्रज्ञानातील सुधारणा करून या वाहिनिने इतर वृतवाहिन्यांच्या तोंडात बोटे घालण्याची वेळ आणली व या सगळ्या मुलभुत बदलांचा शिल्पकार होता आपला मराठमोळा तरूण मंदार परब.
Leave a Reply