धर्माधिकारी, निपुण

कुमारवयातील शारिरीक व भावनिक बदलांमुळे युवकांच नैसर्गिकरित्या बदलत जाणारे भावविश्व, व त्यांच्या स्वभावाला आलेली उमलत्या लैंगिक भावनांची व विचारांची झालर अलगदपणे पकडुन त्यावर स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य करणार्‍या एका, काहीशा वादग्रस्त ठरलेल्या नाटकाने अगदी सामान्य रसिकांपासुन ते तज्ञ समिक्षकापर्यंत सगळ्यांनाच त्याच्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावली होती. प्रायोगिक नाट्यभुमीमध्ये, आजवर कधीही हाताळल्या न गेलेल्या ‘ तरूणांचे लैंगिक परिवर्तन’ व त्यासंबंधीच्या नाजुक विषयांवरती या नाटुकलीने अगदी स्वछ प्रकाश टाकला होता. समाजातील परंपरावादी व कर्मठ स्वभावाच्या लोकांना जरी हे नाटक पचनी पडलेले नसले, तरी त्या वेळी तरूणाईने व समिक्षकांनी या नाटकाला तुडुंब प्रतिसाद दिला होता. तरूणाईच्या मनाला साद घालून व त्यांच्या आकांक्षांच व स्वप्नांच प्रतिनिधीत्व करून त्यांना पुन्हा प्रायोगिक रंगभुमीकडे वणविण्यात या नाटकाने भरगोस यश मिळविले होते. या नाटकाचे नाव होते लुस कंट्रोल, व या नाटकाला एवढ्या पध्दतशीरपणे व कलात्मकतेने पडद्यावर चितारणारा शिल्पकार होता, ‘निपुण धर्माधिकारी’ हा अवघ्या अठरा वर्षांचा युवक.
निपुण व त्याच्या काही मित्रांच्या जीवनात, कुमारवयामध्ये त्यांना आलेल्या अनुभवांभोवती घोंगावणार्‍या या वैचारिक वादळाने रंगभुमीवर एकच खळबळ उडवून दिली होती. लुस कंट्रोल प्रमाणेच प्रेक्षकांना प्रेमात पाडणार्‍या अनेक नाटकांचा धडाकाच त्यानंतर निपुणने उडवुन दिला. दालन हे, ‘नाटक कंपनी’ या निपुण व त्याच्यासारख्याच काही नव्या उर्जेच्या कलंदर मित्रांनी स्थापन केलेल्या, संस्थेने सादर केलेले सांगितीक नाटक अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. मनोरंजन, अंतर्मग्न करणारे घटक, व उत्कृष्ठ अभिनयांचा त्रिवेणी अविष्कार साधलेली त्याची ही नाटके आज प्रायोगिक रंगभुमीवरील मैलाचे दगड ठरले आहेत. त्याच्यासारखे कल्पक, संशोधक व निर्जीव कथेला जींवंत करणारे हाडाचे कलाकार आहेत तोपर्यंत तरी प्रायोगीक रंगभुमीच्या लोकप्रियतेला मरण नाही, हे मात्र खरे! कॉलेजमध्ये असल्यापासुनच निपुणला लघुनाटके व स्कीट्स बसवण्याची भारी हौस होती.

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये, दर्जेदार व उद्योन्मुख तरूण दिग्दर्शकांच्या लांबलचक यादीमध्ये त्याचा क्रमांक नेहमी अव्वल असायचा. त्याचा जन्म एका श्रीमंत व व्यावसायिक कुटुंबात झाला असल्यामुळे, पैसा व फायद्याच्या गणितांपेक्षाही नाटकाचा आत्मा, व बाह्यस्वरूप सकस व सुबक कसा राहील या गोष्टींकडे त्याचे विशेष लक्ष असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*