पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.
पद्मीनी कोल्हापुरे यांचा जन्म १ नोव्हेबर १९६५ रोजी झाला. शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. फिल्म-निर्माता प्रदीप शर्मा (टुटू) हे पद्मिनीचे पती. पद्मिनी कोल्हापुरे यांची आई एअर हॉस्टेस होती.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी पाच वर्षाची असताना ‘एक खिलाडी बावन पत्ते’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर ‘इश्क इश्क इश्क’, ‘जिंदगी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘साजन बिन सुहागन’, ‘सत्यम शिवम सुन्दरम’, ‘इंसाफ का तराजू’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘ज़माने को दिखाना है’, ‘प्रेम रोग’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘लवर्स’, ‘वो सात दिन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘प्यार किया है प्यार करेंगे’, ‘दाता’, ‘स्टार’, ‘मजदूर’, ‘यह इश्क नही आसान’, ‘सड़क छाप’, ‘आग का दरिया’, ‘हम इंतजार करेंगे’, ‘हवालात’, ‘प्यार के काबील’, ‘किरयादार’, ‘प्रीती’, ‘सुहागन’, ‘मुद्दत’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘बेवफाई’, ‘अनुभव’, ‘नया कदम’, ‘नयी पहेली’, ‘प्रोफेसर कि पडोसन’, ‘माई’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’ अश्या जवळपास शेकडो हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या प्रमुख नायिका कायम रसिकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
राज कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, संजय दत्त, जॉकी श्रॉफ, राज बब्बर, कुमार गौरव ते शाहीद कपूरपर्यंतचा हा प्रवास खरंच अथांगच म्हणावा लागेल. त्यांनी ग्लॅमरस, सोशिक, वात्सल्यासोबत विविध जातकुळीच्या भूमिका जिवंत केल्या आहेत.
पद्मिनी कोल्हापुरे आता लवकरच एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘प्रवास’ या चित्रपटात त्या अशोक सराफ यांच्यासोबत दिसणार आहेत.
Leave a Reply