ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला.
परशुराम वैद्य यांनी भारतीय हवाई दलात सुमारे सतरा वर्षे नोकरी केली.१९६८ मध्ये ते या सेवेतून निवृत्त झाले. खडीवाले वैद्य हे भारतीय हवाई दलात नोकरी करत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रात परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे तसेच आपल्या औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी इच्छा १९६४ साली व्यक्त केली होती.
१९७४ साली “वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थे’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आयुर्वेदाचे शिक्षण घेता यावे यासाठी गुरूकुल सुरू केले. त्याचबरोबर “अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय’ येथे अनेक वर्षे कोणतेही मानधन न घेता “रसशास्त्र’ या विषयाचे अध्यापन केले. खडीवाले वैद्य यांनी ऋषीतुल्य महर्षी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नावाने १९७० साली पंचकर्म रुग्णालयाची स्थापना केली.
२०११ मध्ये त्यांनी दुर्गाताई परांजपे मुक्त वाचनालयाची स्थापना केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी स्वखर्चातून औषधी वनस्पतींचे उद्यान उभारले. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रीय होते.
वैद्य खडीवाले यांचे २८ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.
Leave a Reply