देशमुख, प्राजक्त

प्राजक्त देशमुख हे तरूण नाशिक मधले तरूण व्यवसायिक आहेत. प्राजक्त देशमुख यांचा जन्म ७ जून १९८५ रोजीचा ! सौर उपकरणांचे उत्पादन घेणारी देशमुख “सोलर एनर्जी प्रा.ली”, ही त्यांची कंपनी.

पण प्राजक्त यांची ओळख या व्यावसायापुरती मर्यादित राहात नाही.एक चांगले व्यवसायिक असण्यासोबतच ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात. नाशिकच्या अश्वमेध थिएटर्स ह्या संस्थेतुन रंगभुमीवर कार्यरत आहेत. अश्वमेधच्या माध्यमातून त्यांनी सहर, पाणीपुरी, मिडनाईट शो, वन्स अपोन अ टाईम या सारख्या एकांकिकांमधून त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन केले. त्यांच्या सम्थिंग ग्रे ह्या एकांकीकेला ५०वे राज्य नाट्य महोत्सव, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ठ प्रकाश योजनाकाराचे पारितोषिक मिळाले.

कवी प्राजक्त यांची ग्रेवयार्ड लिटरेचर , मीरा, लालनाक्या ही ईपुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय आता त्यांचा “weचार” ह्या काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांच्या काव्याला तरूण रसिकांचा उदंड प्रतिसाद आहे

deshmukh.praj@gmail.com  & praj_deshmukh@rediffmail.com

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*