रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते.
रामचंद्र ठाकुर यांचा जन्म १ डिसेंबर १९०८ रोजी अहमदगड येथे झाला.
त्यांनी १९२८ साली मौज मजाह येथे पत्रकार मह्णून काम केले. त्यांनी सी.एम. लुहार आणि हिरेन बोस यांच्या कडे असिस्टंट म्हणून काम पाहीले. ग्रामोफोन सिंगर हा त्यांचा पहिला चित्रपट. पुढे त्यांनी १९३८ साली डायनामाइट , १९४९ मध्ये नारद मुनि,१९५२ साली बैजू बावरा १९७१ साली तुलसी विवाह १९७२ मध्ये हरि दर्शन,गरीब. सिद्धार्थ नावाची उडिया भाषे मध्ये आणि १९६६ साली स्त्री हे चित्रपट दिग्दर्शित केले.
रामचंद्र ठाकुर यांचे ३१ ऑक्टोबर १९९२ रोजी निधन झाले.
Leave a Reply