“हाल सातवाहनाची गाथासप्तशती” या ग्रंथासह अनेक पुस्तकांचे कर्ते, चतुरस्त्र लेखक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८९७ रोजी बेळगाव येथे झाला.
सदाशिव आत्माराम जोगळेकर हे आठ वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि त्या व्यवसायात स्थिरस्थावर होण्याचा प्रयास करीत होते. त्यांना संगमनेर हे गाव योग्य वाटल्यामुळे त्यांनी दुसरा विवाह केल्यानंतर तिकडे प्रयाण केले.
“सह्याद्री”, “सिंहासन बत्तीशी”, “स्वातंत्र्याची मूलतत्वे” अशा विविध विषयांवरील पुस्तके त्यांनी लिहिली होती.
सदाशिव जोगळेकर यांचे निधन २९ जानेवारी १९६३ रोजी झाले.
Leave a Reply