(जन्म १९३१)
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. विज्ञानसंशोधनासाठी लागणार्या निरनिराळ्या आणि अनोख्या उपकरणांच्या निर्मितीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था’ आणि ‘भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र’ या संस्थांमध्ये उच्च पदावर कार्यरत असताना त्यांनी ‘व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन’ या आता कोलकाता येथे असलेल्या गतिवर्धक उपकरणाच्या प्रस्थापनेत कळीची भूमिका बजावली होती. त्यानंतर ते ‘सीएसआयआर’च्या अखत्यारीतील चंदीगढ
येथील ‘सेन्ट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेन्ट ऑर्गनायझेशन’ (सीएसआयओ) या संस्थेचे संचालक होते.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply