माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे. दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.
दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पथमतः छापण्यात आले.
जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून
पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करुन खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवर्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निवृत्त झाली. ही या पुस्तकाची पार्श्वभूमी आहे.
या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने मालिका येत असे.
Leave a Reply