डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रख्यात गणितज्ञ होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते.
डॉ. श्रीराम अभ्यंकरांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रा.शं.के. अभ्यंकर. ते प्राध्यापक होते. त्यांनी चार गणितज्ञांवर एक पुस्तक लिहिले आहे.
बैजिक भूमितीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणार्या अभ्यंकरांच्या वडिलांनी बालपणी केलेल्या गणिती संस्कारांमुळे त्यांनी स्वयंभूवृत्तीने ज्ञानार्जन करून कॉलेजच्या दुसर्या वर्षातच पदव्युत्तर पातळीचे गणित आत्मसात केले.
अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते.
कविता भालेराव यांनी श्रीराम अभ्यंकर यांचे ‘गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर’ नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply