श्रीरंग मनोहर दिवाण हे नागपुरमधील प्रसिध्द ज्योतिषी, प्रवचनकार, व वास्तुदोषनिवारण तज्ञ आहे. वास्तुशास्त्राच्या काही निकषांवर तसेच सिध्दांतांवर आज आधुनिक विज्ञानही विश्वास ठेवित असल्यामुळे आज अगदी सर्वच व्यवसायांमधील नवीन वास्तु बांधणारे लोकं, वास्तुशास्त्राप्रमाणे निर्दोष मानल्या गेलेलं घर बांधण्याकडे आपला कल ठेवतात. अशा व्यक्तींना शास्त्रशुध्द सल्ले देवून त्यांची वास्तु वास्तुशास्त्राभिमुख बनविण्याचे काम तसेच वास्तुशास्त्रामधील नियमांचे पालन न करून वास्तु उभारली गेल्यामुळे जर तिथे वास्तव्यास असलेल्या जोडप्याला स्वास्थ्य लाभत नसेल तर अशा समस्यांचे योग्य निवारन करणे ही दोन प्रमुख कामे त्यांच्या अख्त्यारित येतात. वास्तुशास्त्राप्रमाणेच त्यांचे ज्योतिषविज्ञान, या भारतात जन्मलेल्या व हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा असणार्या शास्त्राचा आभ्यास देखील अत्यंत गाढा व चौफेर आहे. त्यामुळे इच्छूक व्यक्तींची कुंडली पाहून त्यांना नजीकच्या काळात, उपयोगी पडणार्या उपाययोजना व सल्ले देण्याचे कार्यही ते तन्मयतेने व तत्परतेने करीत असतात. कित्येक निखळलेल्या जोडप्यांना व भरकटलेल्या तरूणांना, पुन्हा उज्वल भविष्याचा रस्ता व सत्याचा प्रकाश दाखविणार्या वाटाडयाचे काम त्यांनी केले असल्यामुळे नकळत त्यांचे अनेकांच्या आयुष्यांवर ॠण आहेत. श्रीरंग दिवाण हे जसे ज्योतिषी आहेत त्याचप्रमाणे ते एक, उत्कृष्ठ, व रसदार मौखिक कौशल्य लाभलेले प्रवचनकारदेखील आहेत. प्रवचनातून श्रोत्यांना अखंड भक्तीभावामध्ये चिंब भिजवतानाच, त्यांच्यातील प्रगल्भ व परिपक्व मानवतेची, परोपकारी वृत्तीची दालने खुली करण्याचे काम ते मोठया खुबीने करतात. प्रवचनातुन समाजप्रबोधन व सर्वधर्मसमभावाकडे घेवून जाणारे विचारमंथन, हा वसा त्यांनी आजवर कायम जपला आहे. विविध आध्यात्मिक विषयांवरचे विपुल लेखन व भागवत, रामायण, गुरूचरित्र, शिवपुराण, ज्ञानेश्वरी, भगवदगीता, मनाचे श्लोक, श्री साई चरित्र, दासबोध, श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री नवनाथ आदी महान ग्रंथांच्या, व थोर विभुती योगी पुरूषांच्या ओठी वसलेले अमृत, त्यांच्या विचारांच्या व उपदेशांच्या, सहज सोप्या निरूपणासकट सामान्य श्रोत्यांच्या जीवनात शिंपडायचे कलात्मक कार्य ते सध्या जोमाने करीत आहेत. दिवाण यांचा जन्म 23 ऑगस्ट, 1968 रोजी नागपुर येथे झाला. प्रवचन, ज्योतिषशास्त्र यांचबरोबर ते रेकी तज्ञ, अॅक्युप्रेशर, एच. आर. डी. ट्रेनर, व व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन करणारे जाणकारदेखील आहेत.
Leave a Reply