आपल्या कर्तृत्वाने देशपातळीवर स्थिरावलेले महाराष्ट्रातील प्रतिभाशाली नेतृत्व. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून सदैव क्रियाशील राहणारा नेता.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या अल्पशा कारकिर्दीत देखील त्यांनी सामान्य माणसाचा उत्कर्ष साधणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनुसूचित जाती व बालहक्क आयोगाची स्थापना त्यांच्याच कारकिर्दीत झाली. राज्यातील वीज चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र न्यायालये उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही परदेशात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती योजना त्यांनी जाहीर केली. सदाबहार, प्रसन्न अशी प्रतिमा असणार्या सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यात सामाजिक न्यायाचे तत्त्व रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
सध्या ते केंद्रीय मंत्रीमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदाची धुराही समर्थपणे सांभाळली आहे.
Leave a Reply