पोलादे, दीपक

बांबूची तिरडी वापरण्याऐवजी अॅल्युमिनिअमची तिरडी वापरली तर? मृत्युनंतर सरसकट नदीत रक्षाविसर्जन करण्याऐवजी त्यासाठी स्वतंत्र कुंड तयार केले तर? धार्मिक क्रियाकर्मांबाबत अशी क्रियाशीलता दाखविणे भावनिक प्रश्नामुळे अवघड वाटते. पर्यावरणाचा प्रश्न अशावेळी थोडा मागे पडतो. कोल्हापूरचे दीपक […]

मिस्तरी, योगेश्वरी

धुळ्यात योगासनाची फारशी क्रेझ नाही. हौसेन योगाभ्यास करावा. असेहि काही नाही. मात्र इथलीच योगेश्वरी मिस्तरी नावाची एक चुणचुणीत मुलगी फ्रान्समधील जागतिक योगस्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह तब्बल ७ पदके जिंकून आली. खर्‍या अर्थाने योगाची योगेश्वरी झालेल्या या […]

फडके, (डॉ.) अविनाश

रोग निदानाच्या क्षेत्रात गेली ३० वर्षे व्यावसायिक यश मिळवून स्वत:च्या नावानेच ब्रॅन्डनेम तयार करणार्‍या डॉ. अविनाश फडके यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजची उलाढाल आज शंभर कोटींच्या घरात पोहोचली आहे. १९ प्रयोगशाळा आणि साडेनऊशे कर्मचारी यांचे बळ आज […]

पुरंदरे, प्रसाद

कुठल्याही क्षेत्रात नव्याने काही बदल घडविण्यासाठी कुणाचा तरी पुढाकर गरजेचा असतो. अॅडव्हेंचर स्पोर्टस, ट्रेकिंग, सायकलिंग या संकल्पनांना प्रत्येक कुटुंबात स्थान मिळावे. यासाठी दहाहून अधिक वर्षे अथक प्रयत्न केल्यावर प्रसाद पुरंदरे यांनी नव्या पिढीला या क्षेत्राकडे […]

लिमये, विक्रम

साडेआठ वर्षे अमेरिकेत बस्तान बसल्यावर विक्रम लिमये यांच्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय तसा कठीण होता. आर्थिक क्षेत्रात तर त्यावेळी भारताची ग्रोथ स्टोरी सुरुही झालेली नव्हती. विक्रम लिमये इथे परतले आणि आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीचे एमडी […]

देशमुख, दिव्या

पॉंडेचरीमधील स्पर्धेत दिव्या देशमुख या नागपूरच्या चिमुरडीने सात वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय जेतेपद पटकावले आणि तिची विजयी घोडदौड सुरु झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत जगातील सर्वांत कमी वयाची वुमन फिडे मास्टर हा किताब तिच्या […]

नेवपूरकर, संतोष

पिंपळी रसायनात पीएचडी मिळवलेले औरंगाबादचे वैद्य संतोष नेवपूरकर हे आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या माध्मातून देशभरात आयुर्वेदातील संशोधनाचे प्रसारकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांचा बुध्यांक, बोन मॅरोवरील उपचार याविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले आहे. शिरोधारा उपचारासाठी तयार केलेल्या […]

साळुंखे, सुरेश

बैलगाडीला डिस्कब्रेक बसविणे किंवा बुलेटला डिझेलचे इंजिन असे कल्पक तांत्रिक प्रयत्न सांगली जिल्ह्यातील शेतकरी सुरेश साळुंखे करीत असतात. त्यांनी आता ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टरच्या आकाराचे बहुपयोगी यंत्र बनविले आहे… सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या […]

मेहेंदळे, निर्मल

प्रदूषण होते म्हणून कारखानेच कसे बंद करणार? उलट कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ, पाणीव्यवस्थापन याबाबत शास्त्रीय कसोट्या वापरुन प्रदूषण रोखणे, हा त्यावरचा उपाय. हरयाणात स्थिरावलेले प्रदूषण नियंत्रक इंजिनीअर निर्मल मेहेंदळे हे गेली तीन दशके उद्योगांमध्ये पर्यावरणाचा शास्त्रीय […]

आंदे, सुभाष

पाणी शुद्ध करण्यासाठी ‘नीरी-झर’ ही गावातल्या माणसालाही पुराचे गढूळ पाणी शुद्ध करता येईल अशी ही सोपी पद्धत त्यांनी विकसित केली.  […]

1 17 18 19 20 21 79