कामत, निशीकांत

निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्‍या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्‍हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
[…]

रामदास पाध्ये

रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जीवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकव तात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.
[…]

नारळीकर, (डॉ.) जयंत विष्णू

जयंत नारळीकर हे त्यांच्या रोचक, रसदार, व सर्वांच्या मनाला भिडेल अशा लेखनशैलीत आकाशातील गुढ तारे व ग्रहांच्या गोष्टी सांगणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. अनेक वैचारिक, वैज्ञानिक, तांत्रिक, काही समजायला सोप्या व काही तर लहान मुलांनाही वाचायला उपयुक्त अशा कथांमधून ते आपल्या सर्वांशी हितगुज साधत असतात.
[…]

काकोडकर, (डॉ.) अनिल

भारताला अणु उर्जा निर्मीतीमध्ये स्वयंपुर्ण बनविण्यामागे जे रथी व महारथी आहेत त्यांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो डॉक्टर अनिल काकोडकर यांचा.
[…]

राहुल देशपांडे

राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज.
[…]

मांडके, (डॉ.) नित्यानंद

नित्यानंद मांडके हे भारतामधील एक सुप्रसिध्द हृद्यरोगतज्ञ होते. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया केल्यानंतर ते खर्‍या अर्थाने प्रकाशात आले असले तरीही त्याआधीसुध्दा अनेक अशक्यप्राय वाटणार्‍या शस्त्रक्रिया त्यांनी त्यांच्या जादुभर्‍या बोटांनी यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४८ मध्ये पुण्यात झाला. बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवला व याच महाविद्यालयात त्यांना त्यांची उर्वरित आयुष्याची सोबतीण मिळाली. शालेय व महाविद्यालयीन जीवनातसुद्धा डॉक्टर नितु हे अतिशय हुषार व कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचीत होते.
[…]

कुलकर्णी, श्रीनिवास

उजव्या कोप-यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.

वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले.
[…]

रानडे, शोभना

प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!

गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
[…]

चिखलीकर, नर्गिसबानू

नर्गिसबानू यांचा जन्म निपाणीजवळच्या चिखली या छोट्या गावामध्ये झाला. कलावंतांचं कुटुंब असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी चिमुकल्या नर्गिसने कथ्थक शिकायला सुरुवात केली होती. इतरांना थक्क करून टाकणारी तिची ही नृत्य कला बाबासाहेब मिरजकर या तिच्या रत्नपारखी गुरूंनीही त्यावेळी चांगलीच ओळखली होती. त्याकाळी कोल्हापुरात लावणी-लोकनाट्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याने अशा नतिर्कांना नेहमीच मागणी असे. उत्तम बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व व नृत्यकौशल्यात पारंगत असणार्‍या नगिर्स यांच्यात अभिनयगुणांचीसुध्दा बिलकुल कमतरता नव्हती. त्यांनी प्रथम लोकनाट्यातून रंगमंचावर पाऊल ठेवलं. […]

टिकेकर, अरविंद

अरविंद टिकेकर मुंबई विद्यापीठाच्या गंथालयाचे मुख्य गंथपाल म्हणून इतरांसमोर प्रकाशात आले. या मानाच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते त्यांच्या आवडीच्या गंथपालन शास्त्रात मन:पूर्वक रमले होते. किंबहुना, नोकरीपेक्षाही अधिक व्यग्र झाले होते. ज्ञानक्षेत्रातली वाटचाल टिकेकरांच्या रक्तात वारसाहक्कानेच आली होती. त्यांचे काका श्री. रा. टिकेकर यांचा विविध विषयांमधला अधिकार, त्यांची चिकित्सावृत्ती आणि अभिजात अभिरुची यांचा संस्कार अरविंद आणि अरूण या दोन्ही भावांवर झाला. अरविंद टिकेकर यांची गंथपाल म्हणून जी जडण-घडण झाली तीच मुंबई विद्यापीठाचे दंतकथा बनलेले मुख्य गंथपाल प्राध्यापक दारा मार्शल यांच्या हाताखाली. टिकेकर यांनी मार्शल यांचा हा वारसा सांभाळला, संपन्न केला.
[…]

1 52 53 54 55 56 79