चिटणीस, इंदिरा

तब्बल ११२ चित्रपटांमधून तसंच १५ नाट्यप्रयोगातून इंदिरा चिटणीस यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या कजाग, खाष्ट सासुच्या भुमिकांची दखल ही नोंद घेण्यासारखी आहे.भालजीं पेंढारकरांच्या “थोरातांची कमळा” या
चित्रपटातील भूमिकेसाठी इंदिरा चिटणीस यांना राज्य शासनाच्या “सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री” तर गरिबाघरची लेक या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री”च्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
[…]

चिटणीस, रमेश द्वारकानाथ

१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील ठाण्यातील सर्वात जास्त गाजलेले प्रकरण म्हणजे पारसिक बोगद्याचे प्रकरण. पारसिक बोगदा म्हणजे मुंबई व महाराष्ट्राचा अंतर्भाग यांना जोडणारा मार्ग, तो जर उध्वस्त केला तर मुंबईचे इतर भागाशी दळणवळण तुटेल याची सर्वांनाच कल्पना होती.
[…]