कामत, निशीकांत
निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
[…]