(जन्म १८९५ मृत्यू १९७८)
भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया घालणारे विकृतिशास्त्रज्ञ आणि जीवाणूशास्त्रज्ञ. देशाच्या निरनिराळ्या प्रांतातील लोकांच्या आहाराच्या व इतर संवयी तसेच तेथील कर्करोगाचे प्रमाण यांचा संबंध तपासण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सर्वेक्षणातूनच तंबाखू, पान आणि सुपारी सतत चघळणे आणि तोंडाचा कर्करोग यांचा निकटचा संबंध त्यांच्या ध्यानात आला. अशा प्रकारे निरनिराळ्या कर्करोगांना
कारणीभूत असणार्या पदार्थांच्या शोधाला चालना मिळाली. इंडियन कॅन्सर रिसर्च सेन्टर (आता अॅडव्हान्स्ड सेन्टर फॉर ट्रीटमेन्ट, रिसर्च अॅन्ड एज्युकेशन इन कॅन्सर, अॅक्ट्रेक ) या संस्थेची स्थापनाही त्यानी केली. कुष्ठरोगाविषयीही त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यातूनच कुष्ठरोगास कारणीभूत ठरणारा आणि प्रयोगशाळेत ज्याची वाढ केली जाऊ शकते अशा एका जीवाणूचा शोध त्यांना लागला. वैद्यकशास्त्राच्या शिक्षणात आधुनिकता आणण्यासाठीही त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. मुंबई विद्यापीठाचे ते कुलगुरूही होते.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply