(जन्म १९२६)
कॅनडाच्या वॉटर्लू विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ. गोडांबे यांच्या संशोधनाचा आरंभ मुंबईत झाला (१९५०-१९५६). त्यांच्या नमुनानिवड पाहणीतील मूलभूत तत्वांसंबंधीच्या संशोधनामुळे संख्याशास्त्रातील अनेक बाबींचा उलगडा झाला. अंदाजबांधणीच्या उपपत्तीत त्यांचा सिंहाचा वाटा असून ती नवे उपक्रम सुरू करणारी आहे. आकलनी फलाच्या पद्धतीशास्त्राची त्यांनी मांडणी केल्यामुळे या उपपत्तीची वाढ होण्यास व नानाविध क्षेत्रात
तिचा उपयोग करण्यास उत्तेजन मिळाले. त्यांचे गाजलेले निबंध १९५५ ते १९६६ सालातील आहेत. त्यांच्या नावावर ७५ शोधनिबंध व ३ ग्रंथ असून कॅनडाच्या रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply