साक्षात्काराचा अर्थ आहे, चित्ताला चिंतनाद्वारे जे मान्य झाले, त्याचें डोळ्यांना दर्शन होणें. चितनाने तर कळलें की प्राणिमात्र एक आहे, परंतु डोळ्यांना तसें दिसलेंहि पाहिजे. मुंगी चालली असेल तर परमेश्वर फिरत आहे असें दिसले पाहिजे. मनुष्य, गाय, दगड या सगळ्यात ईश्वर आहे, हें ज्ञान प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्ञान प्राप्त झालें म्हणजे एक अवस्था गाठली. परंतु त्याच्यापुढे जायचें आहे. एखाद्याला भरत-राम मूर्तीच्या समोर उभे राहिल्यावर त्या मूर्तीत रामाचें दर्शन होतें. परंतु दुसर्या (मनुष्याच्या) मूर्तीत तसें दर्शन होत नाही. याचा अर्थ, साक्षात्कार झालेला नाही; श्रद्धेमुळे एका ठिकाणी दर्शन झालें. साक्षात्काराचा अर्थ आहे, सर्वत्र भगवत्-दर्शन.
-विनोबा (महागुहेत प्रवेश)