नवीन लेखन...

टिप्स नेटभेटीच्या

सध्या इंटरनेटवर ऑनलाईन मॅरेज-ब्युरोजचे मोठे प्रस्थ आहे खरंतर याचा उपयोगही फार होतो. शादी डॉट कॉम, जीवनसाथी. भारतमेट्रीमोनी वगैरेसाख्या साईटसना अक्षरशः हजारोंच्या संख्येने रिस्पॉन्स मिळतो. या साईटसवर वावरताना आणि एकूणच त्यात माहिती भरताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
काय कराल?
सुरक्षित असले तरी या संकेतस्थळांचा वापर सांभाळून करा. आणि सुरुवातीला वेगळ्या ई-मेलद्वारेच संपर्कात राहा.

सामान्यपणे विक्षिप्त वाटेल अशी व्यक्ती शोधा. गंभीर माणसे वेळ आणि मुख्य म्हणजे स्वतःसाठीचा वेळ याचा आदर करतात.

आपल्या प्रोफाईल्सना आलेले रिस्पॉन्स मित्रपरिवारालादाखवत चला. कोणताही पूर्वग्रह नसलेले चांगली मते देऊ शकतात.

फोनवर संभाषण करणे केव्हाही चांगले. संवादकौशल्य आणि समाजात रूळण्याचे कौशल्य यावरून लक्षात येऊ शकते.

फोनसाठी प्री-पेड मोबाईलचा वापर करा. थोडक्यात कॉलर आयडीवर तुमचा नंबर दिसणार नाही, याची दक्षता घ्या.

प्राथमिक पातळीवर सगळ्या गोष्टी पसंत पडून, तुम्ही भेटण्याचा निर्णय घेतला तरी आपले मत आपण कधीही बदलू शकतो, हे लक्षात असू द्या.

जेथे अनेक लोक असतील अशी सुरक्षित जागा, सार्वजनिक ठिकाण हेच तुमचे भेटण्याचे ठिकाण असू द्या. चित्रपटगृह हे भेटण्याचे ठिकाण असू शकत नाही.

जे पैशांची मागणी करतात, त्यांच्यापासून सावध होऊन वेळीच संपर्क संपवा.

काय टाळाल?

आपले नाव, पत्ता, फोन नंबर्स, कामाचे ठिकाण किवा आणखी काही महत्त्वाची आणि व्यक्तिगत माहिती उघड करू नका.

रोजच्या वापरातला किवा ऑफिसचा ई-मेल आयडी देण्याची घाई नको.

नेहमीच्या ई-मेल आयडीतील आपले नाव, फोन नं. आदी माहिती असते. या गोष्टी ऑनलाइन मॅट्रिमोनीत असू नयेत.

ऑनलाइनच्या माध्यमातून जरी भेटत असाल तरी कोणाच्याही फार जवळ जाऊ नका.

खोटारडेपणा, माहितीत सातत्य नसणे तसेच ऑनलाइनवरील त्यांच्या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षातले त्यांचे वेगळे वागणे, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

मित्र, नातेवाईक,सहकारी, घरच्या माणसांशी ओळख करून देण्यास जर ते उदासीन असतील, तर त्याकडेही दुर्लक्ष होता कामा नये.

तुमची भेट ठरली असेल तर त्यांना घरी घ्यायला आणि सोडायला बोलावू नका.

भेटीत रागीट स्वभाव, वर्चस्व गाजवणारी किवा समोरच्याबद्दल अपमान दर्शवणारी वर्तणूक टाळा.

विवाह संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर प्रोफाईल्स बरी वाटली म्हणून ताबडतोब त्याचे ग्राहक होण्याचा मोह टाळा.

या संकेतस्थळांची जी मोफत सेवा असते तिचा फायदा करून घेऊन आपल्या कल्पनेतील राजकुमार/राजकुमारी भेटते का ते पाहा.

तुमचे प्रोफाईल हे कायम अप-टू-डेट ठेवा. मुख्य म्हणजे त्यात तुमच्याशी संपर्क करण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी असू नयेत.

माहितीसोबतच या साईट्सवर आपले फोटोही टाकावे लागतात. हे फोटो कटाक्षाने सोबर असतील असे पाहा.

तुमच्या प्रोफाईलमध्ये असलेली माहिती ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची निदर्शक असावी. उगाच भारंभार गुणवर्णन त्यात असू नये.

आपल्याला कसा जोडीदार हवा, याचा पुरेपूर उलगडा आपल्या प्रोफाईलमधून व्हायला हवा. म्हणजे, अपेक्षा नीट न समजल्याने आलेले रिस्पॉन्सेस तुम्ही टाळू शकाल.

एखादी व्यक्ति तुम्हाला चांगली,तुमच्या अपेक्षांमध्ये बसणारी वाटली तर समोरुन रिस्पॉन्स येईल म्हणून थांबू नका. तुम्हीच पुढाकार घ्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..