मानवी शरीर हे अनेक संस्थांनी बनलेले आहे. या विविध शरीर संस्थांचे नियंत्रण दोन संस्था करत असतात. एक म्हणजे मज्जासंस्था (मेंदू, मज्जारज्जू इ.) आणि दुसरी म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी संस्था म्हणजेच एंडोक्राईन सिस्टीम या ग्रंथीमधील स्त्रावांचे स्त्रवण सरळ रक्तामध्ये होत असल्याने या ग्रंथींना अंतस्त्रावी ग्रंधी म्हटले जाते.
अशा अंत:स्त्रावी ग्रंथीच्या स्त्रावामधील जे रासायनिक पदार्थ रक्तामध्ये संपूर्ण शरीरात फिरत असताना शरीरातील दुसऱ्या अवयवावर परिणाम करून अनेक गोष्टींचे नियंत्रण करीत असतात अशा पदार्थांना हार्मोन्स असे म्हटले जाते.
शरीरातील विविध पेशींची व संस्थांची वाढ, पुनरुपत्ती चयापचय क्रिया, यांना मार्गदर्शन आणि त्यांचे नियंत्रण करून त्यांच्या परिस्पर क्रियात संतुलन ठेवण्याचे काम हार्मोन्स करत असतात. शरीरातील विविध द्रवस्वरूप पदार्थांच्या घटकांच्या नियमनाचे कामही हार्मोन्स करत असतात.
थोडक्यात अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये तयार होणारे रक्तातील जे पदार्थ शरीरातील विशेषत: हळूहळू चालणाऱ्या अथवा टप्प्याने चालणाऱ्या क्रिया नियंत्रण करत असतात त्यांना हार्मोन्स म्हणतात.
हार्मोन्सची वैशिष्ट्ये
हार्मोन्स हे व्हिटॅमिन्स प्रमाणेच अत्यंत सूक्ष्म प्रमाणात भरपूर काय करीत असतात. हार्मोन्स जेथे तयार होतात, त्या ग्रंधी व्यतिरिक्त ते साठून रहात नाहीत. ते रक्तात वहन होताना त्यांचे कार्य झाल्यावर त्यांचा त्वरित नाश होतो. काही हार्मोन्स (उदा. ऍड्रीनॅलिन), अतिजलद कार्य करतात. तर काही हार्मोन्स (उदा. थायरीक्झिन) तुलनेने हळूहळू कार्य करतात. एक अंतस्त्रावी ग्रंथी अनेक प्रकारचे हार्मोन्स देखील तयार करत असते. शरीरातीलर काही क्रियांवर एकावेळी दोन हार्मोन्सचा देखील परिणाम होत असतो. हार्मोन्सचे कार्य हे इतर हार्मोन्सवर अवलंबून असते. तसेच हार्मोन्स ज्या पेशींवर अथवा संस्थेवर कार्य करीत असतात त्यांच्या क्रियेवर पुन्हा नियंत्रितही होत असतात.
हार्मोन्सचे कार्य हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्हिटॅमिन्सशी देखील संबंधित असते. उदा. इ. व्हीटॅमिन्सचा प्रजनन संस्थेतील अवयवांच्या स्त्रावावर परिणाम होत असतो. त्याविषयी सर्वांना माहिती असणे आवश्यक आणि अनिवार्य आहे.
हार्मोन्समध्ये बिघाड कसे उत्पन्न होतात?
हार्मोन्स ज्या ग्रंथी मधून तयार होतात त्या ग्रंथीने हा स्त्राव कमी करणे अथवा प्रमाणापेक्षा अधिक करणे यामुळे हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन उत्पन्न होते. अंतस्त्रावी ग्रंथीत बिघाड होणे, किंवा काही वेळा इतर हार्मोन्सचे कार्य बिघडणे किंवा संबंधित इतर दुसऱ्या अंतस्त्रावी ग्रंथीच्या बिघाडाच्या दुष्परिणामी हे घडत असते.
*अंतस्त्रावी ग्रंथीलाच विकार होणे उदा. सूज येणे, कॅन्सरचा प्रादुर्भाव इ.
*हार्मोन्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांची कमतरता उदा. आयोडीन कमी पडल्यामुळे होणारा गॉयटर.
*अंत:स्त्रावी ग्रंथी नियंत्रित करणाऱ्या दुसऱ्या ग्रंथीमध्ये दोन उत्पन्न होणे. उदा. पिच्युटरी या ग्रंथीचे कार्य वाढल्याने त्याच्या परिणामी हायपर थायरॉईडीझम होतो.
*अंतस्त्रावी ग्रंथीला प्रमाणापेक्षा जास्त काम पडल्यामुळे उदा. अति गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचे नियंत्रण करणाऱ्या स्वादुपिंडावर ताण येऊन डायबेटीस म्हणजेच मधुमेह होतो.
*कोणत्याही कारणाने उदा. मानसिक तणाव, चिंता काळजी, अति शारीरिक ताण. इ. मुळे मज्जासंस्थेत बिघाड झाल्याने हार्मोन्सचे कार्य बिघडते.
*जन्मत: दोष असणेमुळेही काही वेळा अंत:स्त्रावी ग्रंथीत बिघाड उत्पन्न होत असतो. उदा. अनुवंशीकतेने होणारा डायबेटीस अथवा हायपोथायरॉईडीझमचे काही प्रकार.
हार्मोन्स कोणती कार्य करतात?
शरीरातील अनेक क्रियांशी हार्मोन्सचा संबंध असतो. मुख्यत: विचार केल्यास शरीराची योग्य वाढ करणे, हाडांची वाढ करणे, उंची वाढण्याची प्रक्रिया, शरीरातील विविध चयापचय क्रिया नियंत्रित करणे, स्त्री पुरुषातील जननेंद्रियांची वाढ, लैंगिक अवयवांची योग्य वाढ करणे, स्त्री बीज उत्पत्ती क्रिया, शुक्रजंतूची उत्पत्ती वयात येताना होणाऱ्या बदलांचे नियंत्रण, स्तनांची वाढ, स्त्रीयांमध्ये मासिक पाळींची नियमितता, गर्भधारणा, गर्भाची वाढ, स्तनामधील दुधाची निर्मिती, या गोष्टींचे नियंत्रण, रक्तदाबाचे नियंत्रण करणे, शरीरातील जादा चरबीचे नियमन करणे, हृदयक्रिया श्वासोच्छवासाचे नियंत्रण, किडनीचे कार्य, यांचेही नियंत्रण हार्मोन्स करता.
थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्समुळे ऊर्जानिर्मिती, कोलेस्टोरेलचे नियंत्रण, किडनीचे लघवी उत्पन्न करण्याचे कार्य वाढवणे, स्नायूंची कार्यक्षमता, उत्साह, चपळपणा, शरीरराची वाढ ही कार्ये होत असतात.
स्वादुपिंडामधील इन्श्युलीन हार्मोनमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण होत असते. पॅराथायराईड हार्मोन मुख्यत: कॅल्शियमचे नियंत्रण करतो. भुकेची निर्मिती, पचनक्रिया, आतड्यांची हालचाल मलमूत्रांचे उत्सर्जन, हृदयाची गती, रक्तभिसरण, प्रोस्टेट ग्रंथी वाढ अशा अनेक क्रिया सुरळीत होण्यासाठी अथवा नियंत्रणासाठी हार्मोन्सचे संतुलीन कार्याची आवश्यकता असते.
संजीव वेलणकर पुणे
9422301733
संदर्भ.इंटरनेट
खूप छान माहिती आणि अगदी साध्या सोप्या भाषेत धन्यवाद
Great information for hormones … Thanks sirji
अतिशय उपयुक्त माहिती आपल्यामुळे वाचायला मिळाली.
लहान मुलांना हार्मोन चा होतो का
Harmon’s ajune konti Kam kartat
Manat je anton te Kam harmons karte
उंची वाढवन्यसाठी हार्मोन्स घ्यावे लागतात का , कोणत्याही वयात हार्मोन्स घेतल्यास उंची वाढू शकते का
छान हार्मोन्सची माहिती सांगितले आहे.
एकदम सहज व सोप्या भाषेत हार्मोन्सचे महत्व सांगितल्याबद्दल तुमचे आभार
I like your sentence
छान हार्मोन्सची माहिती सांगितले आहे.
सर खुप साध्या आणि सरळ भाषेत आपण समजावुन सांगीतलेले आहे. मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये यायला आवडेल
Any problems for harmone imbalance ayurvedic medicine.
Contact.dr.pramod sir
9529482477
Harmons mule pimples pblm hoto ka
Very nice informatiom and in very simple language thanks sir