आजही आपल्या देशात नरबळी सारखे प्रकार घडता आहेत हया विषयी वाचल्यावर, ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मन सून्न होत. डॉ. दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ गेले की काय असही नराहून वाटू लागत पण ते तस नाही. दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या विरोधात इतका प्रदीर्घ लढा दिल्यानंतरही जर आपल्या देशात नरबळीसारखे प्रकार होत असतील तर आपला देश अंधश्रध्देच्या गर्तेत किती खोलवर रूतलेला आहे हे लक्षात येत. डॉ. दाभोलकरांनी जर अंधश्रध्देच्या विरोधात लढा उभारलाच नसता तर आतापर्यत अजून किती बळी गेले असते याची कल्पनाच न केलेली बरी. जादूटोणा विरोधी कायदा जरी अस्तित्वात आला असला तरी त्याची अंमलबजानी कशी केली जातेय यावर पुढील सर्व निर्भर आहे.
आजही महाराष्ट्रातील कोकण भागात लग्न वगैरे ठरल्यावर अथवा ते होण्यापूर्वी देवाला कौल वगैरे लावण्याचे प्रकार सर्रास होत असतात यात त्यांच्या मनाला पटत असो वा नसो स्वतःला सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित म्ह्णवून घेणार्यांचाही सह्भाग खेदाने असतो, देव आपल्याला ह्वा तसा कौल देई पर्यत स्वतःची आणि त्या अनुशंगाने देवाची फसवणूक करण्याचा हा प्रकार असतो. त्यामुळे कोणाच नुकसान होत नसल तरी काही अंशी का होईना अंधश्रध्देला खतपाणी मिळ्तच हे सत्य नाकारता येणार नाही. गुरू करण हा मोक्षाला जाण्याचा एकमेव मार्ग असा भारतातील बर्याच लोकांचा समज आहे. काही गुरू तर लोकांना चॉकलेट- गोळ्या वाटाव्या तसा गुरूमंत्र वाटत फिरत असतात, शिक्षाची योग्यता न पाह्ता. एखाद्या गुरूमंत्राचा जप केला की आपल्याला सर्व पापातून मक्तता मिळ्ते आणि आपला मोक्षाचा मार्ग सुखकर होतो असा गैरसमजही बर्याच जणांचा झालेला दिसतो. या अशा बुरसटेल्या नव्हे अंधश्रध्देने ग्रासलेल्या विचासरणीचा काही भोंदू साधू फायदा उचलत, आपला स्वार्थ साधत कशी करोडोची माया जमा करतात हे आता जगजाहीरच झालेल आहे. गावाकडे आजही हया ना त्या झाडावरच्या भुताला दरवर्षी कोंबड्याचा नाहीतर नारळाचा नैवेद्य चढ्विला जातोच आहे. हे झाल सर्वसामान्य माणसांबद्द्ल पण जेंव्हा टेलिव्हिजनवर भुत-खेत, जादू-टोणा, पूर्नजन्म आणि कालीजादू वगैरे प्रकार मालिकांच्या माध्यमातून सर्रास दाखविले जातात तेंव्हा या माध्यमाशी संबंधतीत असणारे नक्की समर्थन कोणाच करत असतात ? टेलिव्हिजनसारख्या माध्यमांचा वापर अंधश्रध्दा कमी करण्यासाठी करायचा की त्यांना खतपाणी घालण्यासाठी याचाही नव्याने विचार व्हायला ह्वा.
सध्याचे पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची आपली जबाबदारी पार पाडत नाहीत आणि ती वाया गेली की त्यांना बाबाच्या नाहीतर बुवाच्या पायावर घालतात ज्यातही नवसाने झालेल्या मुलांचा सह्भाग बर्यापैकी असतो. पूर्वी देव्हार्यात निदान देव तरी असायचे पण ह्ल्ली काहींच्या देव्हार्यात देवाच्या जागी बाबा आणि बुवांच्या तस्बिरी लावलेलेल्या दिसतात ज्यांच्यासमोर त्याच बाबांनी रचलेल्या अथवा रचून घेतलेल्या अर्थहीन आरत्यांचा रोज सकाळ-संध्याकाळ न चुकता बोलल्या जातात..
आजच्या समाजातील मागची पिढी पुढच्या पिढीकरून पैसा आणि पुन्य दोन्ही कमावण्याची अपेक्षा करतेय त्यातूनच आई-वडील आणि त्यांची मुलं यांच्यातील दुरावा कमी होण्या ऐवजी वाढत चाललाय आणि तो तसाच वाढत जाणार. आजही आपल्या देशातील कित्येक घरात कोणती ना कोणती अंधश्रध्दा कोणा ना कोणाकडून कळत – नकळ्त जोपासली जातेच. आपल्या देशातील अंधश्रध्दा ही एखाद्या महाकाय अजगरासारखी आहे. जिने डॉ. दाभोलकरांना गिळंकृत केल…आता त्यांच्या नंतर ही त्या महाकाय अजगराबरोबरचा लढा सुरूच आहे. तो लढा कदाचित कधीच संपणार नाही तो असाच सुरू राहणार…
— निलेश बामणे
Leave a Reply