अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती.ही समजूत जुनी असली तरीही आपण यातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे.केशवसूतांच्या ‘जुने जाऊ द्या मरणालागुन’ या उक्तीप्रमाणे आपणच घालून दिलेल्या चौकटी, रूढी-परंपरा, रीतीरिवाज वेळोवेळी बदलत्या काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायचे काम समाजपुरुषाने करायचे असते.त्यामुळे वर्षभर आलेले अपयश झटकून नव्या जोमाने अभ्यासाला लागा.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी समजूत आहे.त्यामुळे विद्यार्थी मित्रहो, आजपासून पुन्हा अभ्यासाला लागा.आज केलेला अभ्यासाला क्षय लागणार नाही.कारण हा सन अक्षय आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे.म्हणूनच संकल्प करा आज मी स्वत:ला अभ्यासात रुजवून घेणार आहे.व यंदा यशाची गोड फळे नक्कीच चाखणार आहे.
Leave a Reply