नवीन लेखन...

अजीर्ण

न जीर्यती सुखेनान्नं विकारान् कुरुते डपिच |
तदजीर्णमिति प्राहुस्तन्म्ला विविध रुजः |

सेवन केलेल्या आहाराचे सम्यक् परिणमन (पचम) न होता तो अपक्वावस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय. अगिमांद्यजनीत हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांचे कारण होऊ शकते. ‘डॉक्टर, मला अजीर्णाचा त्रास आहे.’ अशी तक्रार प्रत्येक डॉक्टरांकडे घेऊन दिवसांतून एखादा तरी रुग्ण सर्रास पहायला मिळतो. साधारण २५ टक्के तरी लोक अजीर्णाने ग्रासलेले आहे.

आता आपण जर ही पाश्चाेत्य जीवनशैली बदलून आपली भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले नाही, तर ही टक्केवारी वाढत जाईल. अजीर्णाचे रुग्ण वाढतील व त्याचबरोबर अजीर्णाने मोठ-मोठ्या आजारांना आमंत्रण मिळेल.

अजीर्णाची कारणे
विषमाशन – आयुर्वेदामध्ये आहार हा कधी घ्यावा, कसा घ्यावा, कीती घ्यावा, कुठल्याक्रमाने घ्यावा, कुठल्या संयोगाने घ्यावा, कीती शिजलेला घ्यावा व कोणत्या विधिनुरूप घ्यावा याचे काही नियम सांगितलेले आहे. पण आपण मात्र या नियमांविरुद्ध जेवण घेतो यालाच विषमाशन म्हणतात. आज बहुतांशी आई-वडिल दोघेही काम करतात. त्यामुळे जेवण हे एकदाच बनवले जाते व तसेच ते फ्रीजमध्येही ठेवले जाते. संध्याकाळी आल्यावर मायक्रोव्हेवमध्ये गरम केले की झाले. पण या सवयीमुळे आपली फ्वन शक्ती कमी होते. ‘रेड टू यूज’ पॅनटचा जास्त वापर घरात व्हायला लागला. क्षारयुक्त व रसायने वापरून टिकवलेल्या पदार्थांमुळे पौष्टिकता कीती? बर्यासचवेळा सकाळी डब्यासाठी शिळेच अन्न नेले जाते. ताज्या फळाऐवजी ‘फेव्हरेट जूस’लाच सगळ्यांची जास्त पसंती आहे. भाज्यापण आठवड्याभराच्या फ्रीजमध्ये भरून ठेवल्या जातात. त्यामुळे ताजेपणाचा विचार हा केलाच जात नाही. वेळेअभावी जीवनशैली बदलली, पण आजारही वाढले.

आज हॉटेलमध्येही सर्रास खाणे-जेवणे वाढले. भाजी, मांस, मटण याची स्वच्छता, निवडणे हा विचार तर केलाच जातच नाही. जीभेला बरे लागते ना मग झाले. खाली आसनमांडी घालून शांत जेवणे ही प्रथा तर आता नष्टच झालेली आहे. हॉटेलमध्ये म्हटलं की परत वर खुर्चीवर बसून गप्पा गोष्टी करत टीव्ही पाहत जेवले म्हणजे आपण काय खातो व कीती खातो याचा तर अंदाजच लागत नाही. फॅशन म्हणून चिकन-मटण खाऊन परत वर आणि आईस्क्रीम खातात किंवा स्वीट डीश खातात. परिणामतः शरीरात कफदोष वाढतो व खालेले पचत नाही व सर्दी, खोकला सारखे त्रासही होतात.

त्याचप्रमाणे हल्ली आपण संध्याकाळी कामावरून घरी येताना समोसा, वडा, केक, भजी यासारखे पदार्थ आणतो, म्हणजे जेवणापूर्वी खाल्ले जाते. जेवण बनवायला उशीर असल्याने हा पर्याय निवडतात. पण याने होत काय तर साहजिकच रात्री उशिरा जेवले जाते. त्यानंतर सोफ्यावर आडवे पडून मालिका बघण्यात अभ्यास करण्यात चॅट करण्यात वेळ घालवतो. जेवणं होईपर्यंत मध्यरात्र होते व आपण लगेच झोपतो. त्यामुळे खाल्लेले जेवण पोटात तसेच पडून राहते. रात्रीचे अन्न पचन नाही. त्यामुळे सकाळी शौचाला होत नाही. पोट साफ नसल्यास निरुत्साह वाटतो. परत सकाळी बाहेर पडायच्या गडबडीत नाश्ता करतो किंवा तसेच बाहेर पडतो. मग दुपारी आणलेला डबा भूक लागू दे किंवा न लागू दे वेळ झाली की खातो. पौष्टिक अन्न जरी असले तरी शांतचित्ताने न जेवल्यास किंवा टेन्शन, राग, दुःख, भीती अशा भावना मनात असल्यास पचन नीट होत नाही व खाल्लेले अंगाला लागत नाही.

वेगविधारण – खाल्लेले अन्न पचते की आपल्याला सपाटून भूक लागते, सकाली उठल्या उठल्या शौचास जाण्याची संवेदना होते, पण सकाळी शौचास न झाल्याने अवेळी होते व मग वेगाचा धारण केला जातो व दोष प्रफुल्लित होऊन पचनसंस्था बिघडते.

दिवास्वाप – रात्रीजागरण – आपल्या जीवनाचं सगळंच वेळापत्रक बदलल्याने आपण रात्री उशिरा झोपतो व ती झोप पुरी करण्यासाठी दिवसा झोपतो. अति गुरु-शीत-स्निग्ध-विदाही अशा आहाराचे सेवन करणे या सर्व कारणांनी अग्निमेद होतो आणि अजीर्ण ही व्याधी उत्पन्न होते.

काही वेळा द्रवरूप पित्त वाढते. प्रफुल्लित झालेले पित्त व कफाने अवरोध होऊन अन्न पोटात पडून राहते. पित्ताच्या उष्ण, तीक्ष्ण गुणांमुळे कोष्ठाच्या इतर भागात प्रक्षोभ होऊन भूक लागल्यासारखी वाटते. ही खरी भूक नव्हे. अशावेळी आहार घेतला जातो व साहजिकच अजीर्णाची उत्पत्ती होते. म्हणूनच खूप खाल्लेतरीही अंगाला लागत नाही.

अजीर्णाची सामान्य लक्षणे
भूक न लागणे, तोंडास चव नसणे, पोट जड वाटणे, पोटात आवाज येणे, गॅस होणे, कधी पातळ संडास कधी मलावरोध, अंग दुखणे, अंग जड होणे, डोके दुखणे, भरभूर जांभया येणे, अंग मोडल्याप्रमाणे होणे.

आमाजीर्ण असल्यास कफ वाढतो व थोडसेही खाल्ले तरी पोटजड होते. रुग्णास अम्लरहित अशा किंवा ज्या प्रकारचे अन्न घेतले असेल त्याचा रस गंध असलेल्या ढेकरा अतिप्रमाणात येतात.

विदग्धाजीर्ण – पित्तप्रकोपाने विदग्धाजीर्ण होते. घशाशी आबंट, तिखट, कडवट येणे, छातीत पोटात जळजळणे, जास्त घाम येणे व तहान फार लागणे. अशी लक्षणे दिसतात.

विष्टब्धाजीर्ण – या प्रकारात वायू व पुरीष यांचा अवष्टंळ होतो. विविध प्रकारच्या वेदना, आध्यान, डोकेदुखी, अंग दुखणे अशी लक्षणे दिसतात.

अजीर्णामध्ये घ्यायाची काळजी व उपचार
अजीर्ण झाले असता, सर्वप्रथम खाल्लेले अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत उपाशी रहावे. नंतर जसजसा अग्धी वाढेल, भूक लागेल त्याप्रमाणात, विविध प्रकारचे यूश, लिंबू सरबत, ताक, पेया, फलरस आणि द्रवाहार द्यावा.

जेवणाच्या वेळा चुकवू नये. दुपारचे जेवण १-२ च्या दरम्यान व रात्री शक्यतो ९ च्या अगोदर. भूक नसल्यास जेवणापूर्वी आल्याच्या तुकड्यावर सैंधव घालून चघळावा. रात्री नुकतेच सॅलाड वैगेर खाऊ नये. अन्न शिजवूनच खावे.

जमत असल्यास आठवड्यातून एक वेळ उपवास करावा. साबुदाणा खिचडी खाऊन नव्हे, तर पोटाला पूर्ण विश्रांती द्यावी. जेवताना शांत चित्ताने, एकाग्रतेने व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ताटातल्या जेवणावर भरपूर प्रेम करावे.

औषधी द्रव्यांमध्ये त्रिटकू, पंचकोल, शंखवटी, हिंग्वाष्टक चूर्ण, आमपाचक वटी, भास्कर लवण उपयुक्त ठरतात.

आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आहारासंबंधी नियम पाळल्यास अजीर्णाचा त्रास होणार नाही. आहाराचे योग्य तर्हेंने पचन होऊ लागले म्हणजे अजीर्ण होत नाही. शुद्ध ढेकर, उत्साह वाटणे, मलमूत्रादिंचे वेग योग्य प्रकारे येणे, चांगली भूक लागणे, शरीर लाघव प्राप्त होणे ही अन्नाचे संपूर्ण पचन झाल्याची लक्षणे होय व पर्यायाने अजीर्ण न घेण्याची.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ.मनाली महेश पवार

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..