नवीन लेखन...

अज्ञानात सुख असते…

एखाद्या वेळेस कपडे परिधान करताना आपल्याला अचानक लक्षात येत की आपल्या नव्या – कोर्‍या कपड्यांवर ही एक लहानस छिद्र पडलेले आहे जे आपण पुर्वी पाहिलेले नव्ह्ते. मग आपण तो पोषाख आपल्यापासून कायमचा दूर करतो आथवा ते छिद्र कोणाला दिसणारच नाही म्ह्णून काय करता येईल याची चाचपणी करतो. इतक करून ही आपण थांबत नाही तर हे छिद्र आपल्या पाहण्यात आज आलं असल तरी इतरांच्या ते कदाचित आगोदरच पाहण्यात आले असेल ते पाहणार्‍यांनी काय विचार केला असेल असा विचार विनाकारणच आपल्या डोक्यात डोकावून जातो आणि मग वैतागुन स्वतःशीश म्ह्णतो ‘अज्ञानात सुख असतं’ प्रत्येक माणसाला सर्वच गोष्टींबद्दल ज्ञान नसत. ते नाही म्ह्णूनच जगातील संतुलन आबादीत आहे सर्वांना सर्वच ज्ञान असत तर या जगाचा कारभार सुरळीत चाललाच नसता याचा अर्थ प्रत्येक माणूस हा अज्ञानी असतोच. ज्या गोष्टीच माणसाला ज्ञान नसत ती गोष्ट करायच्या भानगडीत तो पडत नाही. पण एखाद्या गोष्टीबद्दल त्याला जरा जरी ज्ञान मिळाले आणि ती गोष्ट त्याला आवडली तर त्या गोष्टीबद्दल संपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी जीवाच रान करतो. इतक करून ही ती गोष्ट त्याला मिळाली नाही तर तो पुन्हा स्वतः शीश म्ह्णतो अज्ञानात सुख असत. जगभरातील बहूसंख्य लोक अज्ञानात सुख आहे हे मानूनच जीवन जगत असतात आणि ते त्यांच्या जीवनात सुखी ही असतात पण जे अज्ञानात सुख मानत नाहीत आणि सतत ज्ञानाच्या मागे ते मिळविण्याच्या मागे धावत असतात त्यांच्या वाटयाला या नश्वर जगात सुख कधीच येत नाही. या जगात आपल्यावर प्रेम करणारे बरेच आहेत या अज्ञानात आपण सुखी असतो पण हे जग फक्त स्वर्थाने भरलेले आहे आणि आपल्याला वाटते तसे प्रेम आपल्यावर कोणी ही करीत नाही हे लक्षात आल्यावर आपल्याला अज्ञानात सुख असते असं म्ह्टल्या वाचून राहवत नाही. अज्ञानात सुख मानणार्‍यांच जग खुपच लहान असत आपल कुटूंब इतकच त्याच जग असत आपल्या कुटूंबाच्या समस्यां व्यतीरीक्त इतर समस्याशी त्याला काडीच देण-घेण नसतं. पण अज्ञानात सुख न मानणार्‍याला आपल्या सभोतालच्या घटना आणि समस्या विचलीत करतात इतक्या विचलीत करतात की त्या सडविण्यासाठी ते आपल्या प्राणाचे बलिदान द्यायलाही तयार होतात. माणसाच्या नाते संबंधातही बर्‍याचदा माणूस काही गुंतागुंतीच्या नात्यापासून जोपर्यत अनभिज्ञ असतो तोपर्यत सुखी असतो पण त्याच्या दृष्टीने त्याने ती नात्याची गुंतागुत सोडविताच म्ह्णजे त्या नात्यांबाबतचे त्याचे अज्ञान दूर होताच त्याला अधिक मनस्तापाचा सामना करावा लागतो अथवा त्याचे संपूर्ण जीवनच उध्वस्त होते तेंव्हा ही तो नराहून स्वतःशीश म्ह्णून जातो अज्ञानात सुख असते. कधी-कधी नवनवीन गोष्टीचे ज्ञान मिळविण्याच्या नादात आपण बर्‍याच गोष्टींबद्दलचे ज्ञान आत्मसात करतो आणि मग आपल्याला आपल्या हया मिळविलेल्या ज्ञानाचा वापर इतरांसाठी करण्याची हुकी येते. त्याच्या परिणाम स्वरूप आपल्यावर आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यार विनाकारणच येऊन पडते त्या ओझ्याखाली दबल्यावर ही आपण नकळ्त म्ह्णून जातो अज्ञानात सुख असते. अज्ञानात सुख असतं हे किती ही खरं असल तरी अज्ञानात सुख मानणारे फक्त जन्माला येतात आणि मरतात त्यांच्या जाण्या – येण्याची कोणीही दखल घेत नाही पण अज्ञानात सुख न मानणारेच इतिहास घडवितात. अज्ञानात सूख न मानणारी लोक सर्वसामान्य माणसांपेक्षा निश्चितच वेगळी असतात. अज्ञानात सुख न मानणारे असाधारण जीवन जगतात आणि अज्ञानात सुख मानणारे फक्त जीवनच जगतात…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..