नवीन लेखन...

अट्टाहास ?

एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास लावणारे व परिस्थितीची जाणीव करण्याची गरज वाटण्यास लावते.

मी परिवाहनच्या बस मधून चाललो होतो. अचानक मला एका कामाची आठवण झाली. करण मी ज्या भागातून चाललो होतो, तेथेचमाझे काम होते. आता येईल त्या थांब्यावर आपण उतरुन जावे, हा विचार मनांत आला. त्याच क्षणी माझे लक्ष एका बिल्डींगकडे गेले, जेथे मला जावयाचे होते. समोर सिग्नल आले म्हणून गाडीचा वेग एकदम मंदावला. आपण ह्या मिळालेल्या परिस्थितीचा उपयोग करुन घ्यावा, ह्या विचाराने मी चटकन चालत्या परंतु कमी वेग झालेल्या बसमधून उडी मारुन उतरण्याचा प्रयत्याचा प्रयत्न केली. अर्थात दुर्भाग्य माझे. मला तोल सांभाळता आला नाही. मी पडलो. दुखापत झाली. आणि चार सहा दिवस विश्रांती घ्यावी लागली.
निसर्ग हा महान आहे. कुणाकडून तुम्ही जीतके शिकू शकणार नाही, तीतके जीवनाचे ज्ञान वा तत्वज्ञान तो शिकवत असतो. त्याचा प्रत्येकक्षण आपणास जगायच कस ? ह्याचे मार्गदर्शन करीत असतो. प्रत्येक अनुभव परिपूर्ण असतो. जे त्याबद्दल जागृत असतात, तेच यशस्वी जीवन जगू शकतात. त्याचे कोणतेही मार्गदर्शन दुर्लक्ष केले, तर परिणाम हा वेगळाच होऊ शकतो. ज्याला सर्वसामान्य ‘ भोग भोगणे ‘ असे संबोधून, आपल्या अज्ञानी, भाननिक वागण्यावर पांघरुन टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
मी पूर्वी उड्या मारल्या नव्हत्या कां ? खिडकीतून उडी, झाडावरुन उडी, गच्चीवरुन उडी, सायकलवरुन उडी, डोहांत डूबण्यासाठी उडी, हे सारे आणि असेच करीत भागदौडीत आयुष्याचा मार्ग चालू होता. ह्यातच उडी आणि उडीचा अंदाज, खोली झेपेची छलांग, हे सारे दृष्टीकोण निसर्गानेच तर आम्हास शिकवले होते. ह्या उड्यांच्या खोलांच्या या अंदाजामध्ये सर्वांत महत्वाचे होते ते स्वतःला जाणने की आपली क्षमता किती आहे. शक्ती किती आहे.
निसर्ग तुमच्यामध्ये असलेल्या शक्तीची तुम्हास पूर्ण जाणीव देतो. तशीच ती कशी वाढते वा कमी होते, ह्याचेपण ज्ञान देतो. बालवय वा तारुण्य वयाप्रमाणे वाढणारय़ा हालचाली जादा शक्तीची निर्मिती दाखवतो. त्याचप्रमाणे वृधत्वाकडे झुकणारय़ा वयांत कमी शक्ती निर्मीती होत असल्याचे सुचवितो. ह्यावेळी तुमच्या शारीरिक गरजाना बंधने पडू लागतात. वयाप्रमाणे अवयवांचे कार्य मंदावत जाते. त्याचा परिणाम आवडी निवडी कमी होऊ लागतात. समाधानी वृत्ती निर्माण होते. संघर्ष करण्याची क्षमता जाते. जीद्द हाट्ट ह्या बाबी मंदावतात. आयुष्य रेषेच्या मर्यादा समोर दिसू लागतात. जीवनाभोवती एक बंधनाची चौकट निर्माण झाल्याची जाणीव येऊ लागते. जीवनासाठी संघर्षमय धडपड कमी होऊ लागते. जे जसे आहे, जसे मिळते, जसे होते ते मान्य करण्याची वृत्ती निर्माण होते. दुसरय़ाना सहकार्य, प्रेम संबेध ही भावना जागृत होते. निसर्गाचा हा मार्ग तुमच्या उर्वरीत शांततामय जीवन जगण्याच्या संबंधात असतो.
आयुष्याच्या तर मर्यादा तर ठरलेल्या असतात. त्याची जाणीव देखील निसर्ग वृधाप काळांत करुन देत असतो. आपल्या भावनेना लगाम, तो अवयव अशक्त करुनच करतो. तुम्ही निसर्गाला माना व तसे वागा हाच त्याचा योजनाबद्ध संदेश असतो.
हे सारे सर्व सामान्यासाठी. ज्याना जीवनाची चाकोरी चांगल्या त-हेने समजली असते. परंतु दुर्दैवाने कांहीजण निसर्गाचे हे त्तवज्ञान दुर्लक्ष करतात. ते आपल्या पुर्वानुभवानुसार, अहंकारी स्वभावानुसार वा इतर भावनांच्या अहारी जाऊन, निसर्गाच्या सुचना चाकोरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हिशोबाचा मेळ जमत नाही. परिणाम परिस्थिती सुख-दुःखाच्या हेलकाव्यामध्ये जीवन जगण्यास भाग पाडते.
” वयाल, उड्या मारण्याचे दिवस आता संपले. प्रचंड शारीरिक हालचाली करण्याचा आता काळ राहीला नाही. सावधतेने जगा. ” हा संदेश माझ अंतरमन अर्थात निसर्ग देतच होता ना ? पण मी ऐकले नाही. होऊन जाईल सहज हे सारे. त्याक्षणाच्या ह्या भावनिक विचारांना मी बळी पडलो. आणि उडी मारताना खाली पडलो.
कशासाठी हे घडले?
निसर्गाला हे दाखऊन द्यायचे होते की ” तू स्वतःला जाणून घे. तुझी क्षमता जाण. वयाचा आदर कर. हे जाणने म्हणजे जसा मी कोण आहे हे समजणे. त्याच प्रमाणे ‘मी ‘ ला जे शरीराचे कवच मिळालेले आहे ते देखील जाणने. हे होय “

डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..