शर्मिला टागोर, मुमताज आणि हेमा मालिनी सारख्या ताकदीच्या नायिका पडदा गाजवत असताना जया भादुरी या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी जबलपुर, मध्य प्रदेश येथे झाला. सत्तरच्या शतकात सर्वसामान्य, नाकासमोर चालणा-या मुलीला ग्लॅमरच्या जगात पाय रोवणे कठीण होते. पण, जया भादुरी यांचा साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी रहाणा-या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली.
जया भादुरी यांना सर्वप्रथम बंगाली निर्माते सत्यजीत रे यांनी ‘महानगर’ या चित्रपटात संधी दिली.
ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘सुमन’ मध्ये त्यांचा अभिनय पाहिला आणि आपल्या ‘गुड्डी’ या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. ‘गुड्डी’ चित्रपटही गाजला आणि जया भादुरी यांना लागलीच राजश्री प्रोडक्शनचा की फिल्म ‘उपहार’ या चित्रपटाची नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपारीक पेहराव, सामान्य वागण्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अत्यंत कुशलतेने आपल्या इमेजमध्ये बदल केला आणि पिया का घर, अनामिका, परिचय, कोरा कागज, अभिमान, मिली, कोशिश सारखे उत्तम चित्रपट केले. ताकदीची अभिनेत्री म्हणून ओळख झाल्यावर त्यांच्यासमवेत काम करताना भलेभले कलाकरही घाबरत असत. अमिताभ बच्चन आणि संजीवकुमार यांच्याबरोबर त्यांनी अधिक काम केले. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट पुण्याचा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये झाली. त्यानंतर ते गुड्डीच्या सेटवर भेटले. बंगाली संस्कृतीनुसार ३ जून १९७३ मध्ये दोघांचा विवाह पार पडला होता. अमिताभ आणि जया बच्चन या जोडीचे ‘चुपके चुपके’, ‘अभिमान,’ ‘सिलसिला’ आणि ‘जंजीर’, ‘एक नजर’ ‘कभी खूशी कभी गम’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. लग्नानंतर त्या संसारात रमून गेल्या. आज बच्चन परिवार जगातील ग्लॅमरस, प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार आहे. त्यांचे कुटूंब सुपरस्टार असले तरी त्यामागे जया भादुरी बच्चन यांचे मोठे योगदान आहे, हे सर्वज्ञात आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जया भादुरी यांची गाणी व चित्रपट
https://youtu.be/YBhs0DBcDYs
Leave a Reply