गेल्या काही दिवसात अध्यात्म याच्याशी संबंधीत आपल्या देशात जी काही प्रकरणे उगड झाली आहेत त्यामुळे अध्यात्म या विषयावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. आजही आपल्या देशात स्वतःला अध्यात्मिक गुरू म्ह्णवून घेणार्यां भोंदूंची कमी नाही. सर्वच अध्यात्मिक गुरू भोंदू असतात असं नाही म्ह्णता येणार आणि खर्या अध्यात्मिक गुरूंची समाजाला गरज ही आहेच. फक्त गुरू मंत्र देण्याच्या नावाखाली शिक्षांचा गोतावळा तयार करून आपल्या देशात चहाच्या टपर्यासारखी जी मठे उभारली गेलेली आहेत तेथे दिल्या गेलेल्या मंत्रात किती ताकद असेल ते त्या देवालाच ठावूक ! याच मठांच्या जागेवर अनेक गुन्हे घडल्याचेही कित्येकदा निदर्शनास येत असते. पुर्वी या बाबा, बुवा आणि भोंदू अध्यात्मिक गुरूंच्या नांदी फक्त अशिक्षीत लोकच लागत असत पण आता स्वतःला उच्च शिक्षीत म्ह्णवून घेणारे ही या बाबा – बुवांच्या पायावर पडलेले दिसतात. गरीब श्रीमंतीच स्वप्न पाहत आणि श्रीमंत मोक्षाच स्वप्न पाहत या बाबा-बुवांच्या नादी लागतो. गुरूला साक्षात त्रीदेवांपेक्षा मोठ मानणारी आपली संस्कृती त्यामुळे ही संस्कृती मानणारे आपलं सर्वस्व ही गुरूच्या चरणी अपर्ण करायला मागे पुढे पाहत नाहीत. प्रसंगी आपल्या अध्यात्मिक गुरूंसाठी आपले प्राणही देण्याची शिक्षांची तयारी असते. मागच्या काही वर्षात आपल्या देशात खर्या अध्यात्मिक गुरूंचे दर्शन सर्वसामान्यांना नशिबानेच होते पण त्याउलट भोंदू बाबांची अनेक प्रकरणे एका मागून एक उगडी होत आहेत. सध्याच्या अध्यात्मिक गुरूंकडे असलेल्या संपत्तीचे आकडे पाहिल्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगपतींनाही घाम आल्यावाचून राहत नसेल. एकीकडे आपला देश मंगळावर जाण्याची तयारी करतोय आणि याच आपल्या देशातील राजकीय मंडळी जर बाबा- बुवांच्या पायावर लोटांगण घालतात अस चित्र भविष्यात दिसल तर ते आपल्या देशाचच दुदैव म्ह्णावं लागेल दुसर काय ?
अध्यात्म की बाजार…
1 2