नवीन लेखन...

अनैतिक संबंध आणि समाज

एकाचवेळी दोन वेगवेगळ्या बातम्या लक्ष वेधून घेत होत्या आणि विचार करायला प्रवृत्त करीत होत्या. पहिली बातमी एक 66 वर्षीय आजी आपल्या अंथरूणावर खिळलेल्या पतीच्या उपचारांसाठी पैसे नाहीत म्ह्णून मॅरेथॉनमध्ये धावल्या आणि जिंकल्याही. दुसर्‍या बातमीत एका 11 वर्षाच्या मुलाला त्या मुलाच्या आईनेच आपले अनैतिक संबंध त्याने आपल्या पतीला सांगू नये म्ह्णून अमानुषपणे बेदम मारहान केली. एक बातमी संस्कार, सभ्यता, श्रध्दा, विवाह संस्था आणि संस्कृतीवरचा विश्वास दृढ करीत होती तर दुसरी बातमी समाजात वाढत असलेल्या अनैतिक संबंधांच प्रमाण आणि त्याचे होणारे संभाव्य परीणाम याकडे लक्ष वेधून घेत होती. समाजात अनैतिक संबंधांच प्रमाण वाढतय हे निश्चित. त्याचा सुचक म्हणजे काही प्रमाणात अनैतिक संबंध दर्शवूनही काही मालिकांना मिळालेला टी.आर.पी. म्ह्णता येईल. अनैतिक संबंध पुर्वीही समाजात होते, पण ते अपवादात्मक होते आणि आपवादात्मक असतानाही ते क्वचित उजेडात यायचे. पण आजकाल असे संबंध खुलेआम ठेवले जातात आणि आता तर समाजात अशा संबंधाच समर्थन करणारा एक वर्गही तयार होऊ लागला आहे. म्ह्णूच आपल्या देशात आता घटस्फोटाच प्रमाण वाढू लागल आहे आणि भविष्यात ते कमी होणार नाही तर अधिकच वाढत जाणार आहे. संस्कार,संस्कृती आणि नैतिकता तर आता काही लोक आपल्या बुडाखालीच घेऊन बसलेत. आजकाल कोणीही कोणाच्याही प्रेमात पडत अगदी सख्या नात्यातही आपण स्त्री-पुरूष आहोत इतकच त्यांना प्रेमात पडायला आणि अनैतिक संबंध प्रस्तापित करायला पुरेस असत. प्रेमाच्या नावाखाली समाजात आजकाल बर्‍याच चुकीच्या गोष्टी पेरल्या जात आहेत आणि त्याच समर्थनही होत आहे दुदैवाने. याचे भयंकर परिणाम समाजाला भविष्यात भोगावे लागणार हे निश्चित. मानवअधिकार आणि स्वातंत्र यांच्या नावाखाली स्वैराचालाला जोपासल जातय. अनैतिक संबंध किती ही लपवून ठेवले तरी ते लपून राहत नसतात. पुर्वी त्याची चार – चौघात कोणी वाच्यता करीत नव्ह्त इतकच पण आता ते होण नाही त्यामुळे त्याचे संभाव्य परिणाम आता अनैतिक संबंध ठेवणार्‍यांना भोगावेच लागणार. अगदी सुप्रसिध्द असणार्‍या व्यक्तीही याला अपवाद ठरू शकत नाही. अनैतिक संबंधांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या देशातील संस्कृती आणि संस्कारांची पायमल्ली केल्यासारखेच होईल. ज्या प्रेमाच्या नावाखाली समाजात आज अनैतिक संबंध फोफावलेत त्या संबंधांमूळेच प्रेम आणि नातेसंबंध यांच्या सिमारेषा फुसट होतील आणि मग वासनेपुरतेच प्रेम आणि वासनेपुरतीच नाती उरतील. लोकांना जगण्यापेक्षाही मरण महाग होईल. आज परदेशात ज्या काही सामाजिक समस्या त्यांना भेडसावतायत त्या सर्वच्या सर्व समस्या आपल्यालाही भेडसावू लागतील. आपल्या देशातील लोकसंख्येचा विचार करता ते आपल्याला परवडणार नाही. आपल्या देशातील वर्तमान पिढी दोन दगडावर पाय ठेवून चालतेय ते दोन दगड आहेत संस्कृती आणि स्वैराचार. संस्कृती आणि स्वैराचार कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. अनैतिक संबंध निर्माण करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्ने विचारायल हवीत उदा. आपण जे करतोय ते योग्य आहे का ? आपण असं केल्यामुळे समाजावर त्याचा काही वाईट परिणाम होईल का ? आपण अस केल्यामुळे किती जणांच आयुष्य उध्वस्त होऊ शकत ? इतक सार करूनही आपण शेवटी सुखी होणार आहोत का ? आपल्या देशात संस्कृती आणि संस्कारांचा जो र्‍हास होत चाललाय तो र्‍हासच समाजात अनैतिक संबंध वाढण्याच्या मुळाशी आहे त्यामुळे भविष्यात समाजात अनैतिक संबंधांच प्रमाण वाढतच जाणार त्यामुळे आता त्याच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्याखेरीज समाजाच्या हातात काहीच शिल्ल्क नाही अस निदान आताच तरी खेदान म्ह्णावं लागतय…

लेखक – निलेश बामणे
मो. 9029338268
Email-nileshbamne10@gmail.com

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..