चला खूप उशीर होतोय पटापट आवरा. आणि एकदाची धावपळ करत आपण कामावर / ऑफिसला निघतो, एकतर नेहमीप्रमाणे उशिरा उठून आपण ही धावपळ करत असतो. सर्व कसं सुरळीत चालू असत आणि एखाद्या दिवशी आपल्याला रस्तावर अपघात झालेला दिसतो कोणीतरी मनुष्य रक्तबंबाळ झालेला आपल्याला दिसतो. आपण ते पाहून त्रस्त होतो.
लगेच ते पाहून आपल्या मनात पाल चुकचुकते ती पाल आपल्याबद्दल असते. पण खरोखर अपघात टाळू शकतात का ? पण असो तो काही आपला विषय नाही.
माझं एवढंच म्हणणं आहे कि आपण रोज सकाळी ऑफिसला / कामावर जातांना / येतांना घाईत असतो. त्यावेळी फक्त नामस्मरण करत गाडी चालवा. बघा तुम्हालाच स्वतःला अनुभव येतील. मला तर स्वताःला बरेच वेळा अनुभव आलेला आहे म्हणून याबद्दल मी लिहित आहे.
आता तुमच्या मनात शंका येईल कि हि अंधश्रद्धा असेल. असुदे पण नामस्मरण करून जर माझा फायदा होत असेल तर काय हरकत आहे आणि मला काही त्यासाठी पैसे मोजावे लागत नाही उलट मी नामस्मरणामुळे वर्तमानकाळात राहतो, डोक्यात नको ते विचार येत नाहीत (फक्त गाडी चालवतांना बरं का)
—
Leave a Reply