नवीन लेखन...

अपेक्षांच्या ओझ्याखाली

एखाद्या मुलीची प्रेमप्रकरणे, लग्नापूर्वी त्यातील एखाद्याशी आलेले तिचे शारीरिक संबंध आणि एकूणच तिचा प्रेमाकडे खेळ म्ह्णून पाहण्याचा स्वभाव तिच्या होणार्‍या नवर्‍यापासून त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी जाणिव पूर्वक लपविणे हा गुन्हा नाही का ? असल्यास त्यासाठी कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे की नाही ? या भानगडीत न पडता आपण या गोष्टीकडे जरा डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला हवा ! पूर्वी बर्‍याचदा मुलच प्रेमाच्या बाबतीत मुलींची फसवणूक करायचे पण आता त्यात मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. मांजर कशी उंदराला खेळवते तशा काही मुली मुलांना खेळ्वतात, त्यांच मानसिक खच्चीकरण करून त्यांना व्यसनाधिन बनवितात हे सत्य आहे पचायला किती ही जड असल तरी.

आपल्याला प्रेमाची फक्त गुलाबीच बाजूच माहीत असते पण प्रेमाला एक काळी बाजू ही असते. आपल्याला आता त्या काळ्या बाजुचाच विचार करायचाय. कोणताही सारासार विचार न करता फक्‍त प्रेमात पडायचं म्ह्णून कित्येक तरूण-तरूणी प्रेमात पडत असतात. त्यांच्या प्रेमात पडण्यात प्रेम कमी आणि वासनाच अधिक असते. आपली वाया गेलेली मल-मुली लग्नानंतर सुधारतील या मुर्ख विचारसरणीतून पालक आपल्या अशा वाया गेलेल्या मुला-मुलींची लग्ने चांगल्या, सभ्य, सुसंस्कृत आणि सामाजिक जाणिव असणार्‍या मुला-मुलींशी लावून देतात आणि विनाकारण त्या निष्पाप व निरापराध मुला-मुलींच्या आयुष्याच मातेर करतात. त्यांना हे असं करण्याचा नैतिक अधिकार दिलाच कोणी ? प्रेमा- ब्रिमाच्या भानगडीत न पडता ठरवून विवाह करण्यासाठी उभे असलेली तरूण-तरूणी विवाहाच्या बाबतीत खूपच आशावादी असतात, सामाजिक बांधीलकी जपणारे असतात, समाजात त्याना मान असतो त्यांना आदर्श मानल जात असत अशापैकी एखाद्या वाट्याला विवाहाच्या बाबतीत फसवणूक आली तर तो कोळमडतो आणि त्याचा परिणाम त्याच्या भविष्यावर आणि पर्यायाने देशाच्या भविष्यावर होतो. स्वतःच्या स्वार्थासाठी देशाच्या भविष्याशी खेळ्ण्याचा कोणाला नैतिक अधिकारच काय ?

आपल्या देशातील उच्चशिक्षीत तरूणांनाही आपल्या बायकोचे विवाहापूर्वी इतर कोणाशी प्रेमप्रकरण होते आणि तिचे त्याच्याशी शारिरीक संबंधही आले होते हे पचविणे आजही जड जात हे सत्य नाकारता येणार नाही. प्रेम माणसाला आंधळ करत पण सध्याच्या काळात ते आई-वडिल वगैरे नाते- संबंधाच्या बाबतीतच खर ठरत. आजच्या प्रेमात पडलेल्या तरूण- तरूणींना प्रेम आंधळ करीत नाही तर त्यांची वासना आंधळी करते. एखाद्या तरूणासोबत दोन – तीन वर्षे प्रेमाच्या आणा-भाका घेऊन त्याच्यासोबत प्रेमाच्या सर्व सिमा-रेषा ओळांडून झाल्यानंतरही एखादी तरूणी त्या समोरच्या तरूणाकडे स्वतःच्या मालकीच घर नाही म्ह्णून लग्नाला नकार देत असेल ते ही आपल्या पालकांच्या दबावाला बळी पडून आणि आई – वडीलांनी सर्व काही माहीत असतानाही उभ्या केलेल्या तरूणाशी विवाह करून संसार थाटण्याची मानसिक तयारीही करत असेल तर या प्रकरणात त्या तरूणाचा प्रेमावरचा आणि स्त्री जातीवरचा विश्वास उडणारचं की. पण या सगळ्यात सर्व काही माहित असताना तिने दुसर्‍या कोणाशी विवाह करण्याचा आग्रह धरणारे उच्चशिक्षीत पालक गुन्हेगार नाहीत का ? एकाच वेळी अनेकांची आयुष्ये आपल्या स्वार्थासाठी पणाला लावणारे ?

हो ! हे खरं आहे समाजात हे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे ठरवून लग्न करताना आई-वडील जवळ्चे नाते वाईक यांच्यावरच अवलंबून न राहता मुला-मुलींनी स्वतःही काही गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी हे आज अपरिहार्य झालय. विवाह मंडळात नाव नोंदविणार्‍यांनी आपली माहिती खरीच दिलेली असते याची खात्री देता येत नाही. कित्येक लोक चेहर्‍यावर अनेक मुखवटे चढवून वावरत असतात लोकांना ते दिसतात ,वाटतात तसे ते प्रत्यक्षात कधीच नसतात. बर्‍याचदा समाजातील काही घटक मुला-मुलींना विवाह जुळवतांना एकमेकंबद्द्ल खोटी माहिती देण्यास भाग पाडतात. लग्न झाल्यावर सारं काही सुरळीत होईल या खोट्या आशेवर. पण त्यांना याची कल्पना ही नसते की आता समाजाच्या भितीने लग्न टिकवून ठेवण्यासाठी अट्टहास करण्याचा काळ केंव्हाच मागे पडलाय आता तर लग्नाच्या दोन- चार दिवसानंतरच घटस्फोटाची मागणी करण्याच प्रमाण समाजात वाढू लागलय. आजच्या तरूण- तरूणींच्या आपल्या जोडीदारांकडून अपेक्षा भरमसाठ वाढल्या आहेत आणि आता त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली प्रेम आणि पर्यायाने विवाह्संस्थाही दबली गेली आहे हे सत्य नाकारता येणारच नाही…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..