महाभारतातील अभिमन्यू झालाय माझा
आईच्या पोटातून शिकून जन्माला येण्याची
ज्याने मोजली होती फार मोठी किंमत….
जीवनाच्या चक्रव्यहात आज मी ही एकटा
लढतोय आणि माझ्यावर हल्ला करतायत
चारी बाजुंनी माझेच नातलग…..
समाजात चाललेल्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात
लढण्यासाठीच समाजाने रचलेल्या चक्रव्युहात
शिरलो होतो मी अर्धवट ज्ञानासह…
आता त्या अभिमन्यू प्रमाणे माझा ही
लढता लढता बळी जाणार समाजाच्या
विरोधात हे आता निश्चित झालय…….
महाभारतातील अभिमन्यू कडून मी बोध
घ्यायला हवा होता अर्धवट ज्ञानावर
समाजाच्या विरोधात न लढण्याचाच……
इतिहास ज्यांची नोंद घेत नेमका त्यांच्याकडे
वेळ कमी का असतो विचार करायला
हे कोड मला आज उलगडतय…..
विचार करुन कृती करणारे इतिहास घडवत नसतात
अर्धवट ज्ञान असतानाही हिंमत करून अन्यायाविरूध्द
लढणारेच जगात कदाचित अभिमन्यू ठरतात……
कवी-निलेश बामणे.
Leave a Reply