नवीन लेखन...

अर्धशिशी

कुठल्याही त्रासदायक गोष्टीला आपण डोकेदुखीची उपमा देतो, याचे कारण हेच, की डोकेदुखी चालू झाली तर माणूस अक्षरशः हतबल होतो. त्याची कार्यशक्ती, विचारशक्ती, इतकेच नव्हे, तर आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेण्याचे त्याचे सामर्थ्यही रसातळाला जाते. अर्धशिशी किंवा मायग्रेन ही अशाच प्रकारची वेदना आहे. अशा प्रकारची डोकेदुखी- मज्जातंतूंच्या दाहामुळे होत असली तरी हा दाह का होतो, याचे अचूक कारण वैद्यकीय शास्त्राला अजून तरी ज्ञात नाही. या विकारामध्ये डोके मध्यम किंवा अति ठणकणे (काही लोकांमध्ये डोक्या ची एकच बाजू, तर ४० टक्के लोकांमध्ये डोके पूर्ण ठणकते.) या वेदनेबरोबरच उलटी होणे, मळमळणे, प्रकाश सहन न होणे, आवाज सहन न होणे, शांत अधाऱ्या खोलीत झोपून राहावेसे वाटणे, अस्वस्थता वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. कुठलाही उपाय न केल्यास असा त्रास साधारणतः २ ते ४८ तासांपर्यंत राहू शकतो आणि नंतर त्याची तीव्रता आपोआपच कमी होत जाते. डोके दुखल्यानंतर थकवा, चिडचिडेपणा जाणवू शकतो व नंतर काही दिवस वेदना झालेला डोक्यााचा भाग दुखरा जाणवतो. अर्धशिशीचे अचूक कारण जरी माहीत नसले तरी वातावरणातील घटक, ऊन, हवा, वारा आणि आनुवंशिक घटकही कारणीभूत असतात, असे दिसून आले आहे. भावनातिरेक व नैराश्य, हीही भर घालणारी महत्त्वाची कारणे आहेत. याखेरीज पौगंडावस्थेत जेव्हा हॉर्मोनल बदल शरीरात घडून येतात तेव्हाही हा त्रास होऊ शकतो. स्त्रियांमध्ये ही व्याधी पुरुषांपेक्षा जास्त आढळते. सतत डोके दुखरे राहणे, ठणकणे, आवाज, प्रकाश अजिबात सहन न होणे, कोणत्याही कारणामुळे – झोप जास्त झाली म्हणून किंवा जागरण झाले म्हणून – अशा प्रकारचा त्रास होणे, यामुळे माणसाच्या जीवनमानावर काय परिणाम होतो, याची आपल्याला चांगलीच कल्पना येऊ शकते. वेदनाशामक औषधांनी दुखणे तात्पुरते थांबते; पण प्रवृत्ती मात्र जात नाही आणि वर्षानुवर्षे तोच त्रास होत राहतो. मात्र काही चाचण्या करूनही अर्धशिशीच आहे आणि इतर कोणत्याही प्रकारच्या व्याधीमुळे होणारी डोकेदुखी नाही, हे निश्चिूत करणे फार महत्त्वाचे आहे. अनेक चाचण्या होऊनही रोगाचे निदान किंवा मूळ कळत नाही. डोकेदुखी तर पाठलाग करते. अशा वेळी होमिओपॅथी रुग्णाच्या मदतीला येते. रुग्णाला त्रास तर होतोच आहे, परंतु निदान तर होत नाही किंवा रोगाचे मूळ कारणही समजत नाही, अशी परिस्थिती अनेक वेळा येते. अशा वेळी परिणामकारक उपचार उपलब्ध करून देणे हा होमिओपॅथीचा विशेष आहे. मायग्रेन ही अशाच प्रकारची व्याधी- ज्यामध्ये वेदनेचे मूळ कारण कळत नाही, पण अशा व्याधीमध्ये रुग्णाच्या शारीरिकतेचा आणि मानसिकतेचा पूर्ण अभ्यास करून रामबाण उपाययोजना करता येते. अशा वेळी साधारणतः तीन ते चार महिने एकसंध उपचार घेणे गरजेचे ठरते. होमिओपॅथीतील नक्साव्हीमिका, बेलाडोना, ब्रायोनिया ही आणि यासारखी औषधे उपयुक्त आहेत. हळूहळू डोके दुखण्याची तीव्रता आणि वारंवारता कमी होते. डोके दुखण्याची प्रवृत्तीही कमी कमी होत जाते. कुठल्याही कारणाने डोके दुखेल, ही भीती हळूहळू नाहीशी होऊन रुग्णाचा आत्मविश्वा स वाढतो आणि डोके धरून चिंतातुर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर हळूहळू हास्य फुलायला लागते. होमिओपॅथी मूळ किंवा कारण न कळणाऱ्या रोगांसाठी वरदान आहे. सर्व उपचार पद्धतीबाबत आपला दृष्टिकोन आपण व्यापक, सजग ठेवायला हवा आणि त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी जरूर घ्यायला हवा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. अपर्णा पित्रे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..