अलिबाग एक निसर्गरमणीय गाव.
अलिबाग म्हटल की आठवतात,आमराया व नारळी-फोफळीच्या बागा.स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे,मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल…..निसर्गाने मुक्तहस्ताने उधळन केलेले डोंगर,कनकेश्वर, सिद्धेश्वर, रामधरणेश्वर…..
आडवडाभराचा शीण, ताण हलका करण्यास मुंबईकर गेटवे ऑफ इंडीया येथून तासाभरात मांडव्याला येतात.पण आता यापुढे हे शक्य होणर नाही कारण……
आज संपूर्ण अलिबाग तालूका औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या विळख्यात सापडला आहे.एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सात ते आठ औष्णिक विद्युत प्रकल्प अलिबाग मध्ये येऊ घातले आहेत.महाराष्ट्राच्या वीजेची गरज भागविण्यासाठी अलिबागचा बळी देण्याची योजना सरकारने आखली आहे.दररोज लाखो टन कोळसा जाळला जाणार आहे. औष्णिक वीज केंद्रातील प्रदूषणामुळे लोकांच्या संसाराची राखरांगोळी होणार आहे. हवेतून येणा-या राखेचे थरावर थर चढून जमीन नापीक होणार आहे. रुग्णालयात दमेक-यांच्या रांगा लागणार आहेत. पिकवायचं काय आणि खायचं काय याची विवंचना अलिबागकरांना भेडसावू लागलीय.
महाराष्ट्राच्या वीजेची गरज भागविण्यासाठी संपूर्ण अलिबागची राखरांगोळी करणे योग्य नाही.
जर हे सर्व औष्णिक विद्युत प्रकल्प झाले तर मुंबईकरांना सुद्धा याची किंमत भविष्यात चुकवावी लागेल.
— संजीव म्हात्रे
Leave a Reply